Khelo India Beach Games 2025 – महाराष्ट्राच्‍या दिक्षाची सुवर्ण सकाळ, सागरी जलतरणात 1 सुवर्णासह 2 कांस्यपदकांवर कोरलं नाव

Khelo India Beach Games 2025 – महाराष्ट्राच्‍या दिक्षाची सुवर्ण सकाळ, सागरी जलतरणात 1 सुवर्णासह 2 कांस्यपदकांवर कोरलं नाव

पहिल्‍या खेलो इंडिया बीच स्पर्धेतील सागरी जलतरणात दिक्षा यादवच्‍या कामगिरीमुळे महाराष्ट्राने स्‍पर्धेतील सुवर्ण सकाळ अनुभवली. 10 मीटर स्‍विमथॉन प्रकारात महाराष्ट्राने दिक्षाच्‍या सुवर्णपदकासह 2 कांस्यपदकांची कमाई केली. बीच पेंचक सिलटमध्ये देखील महाराष्ट्राने स्‍पर्धेतील पहिले सुवर्णयश संपादले. 2 सुवर्णांसह 9 पदकांची लयलूट करीत महाराष्ट्र पदकतक्‍यात तिसऱ्या स्‍थानावर आहे.

दीवच्‍या अरबी समुद्रात पहाटे 6 वाजता 10 मीटर स्‍विमथॉनचा थरार रंगला. महिलांच्‍या गटात सुरुवातीपासून महाराष्ट्राच्‍या 19 वर्षीय दिक्षा यादवने मुसंडी मारली होती. 2 मिनिटे 18.09 सेकंद वेळेत शर्यतीचा पल्‍ला पार करीत दिक्षाने सुवर्णपदक पटकावले. रौप्‍य व कांस्यपदकांसाठी अनुक्रमे महाराष्ट्राच्‍या पूर्वा गावडे व तामिळनाडूच्‍या एम. आरना यांच्‍यात शर्यत रंगली. दोघींनीही एकाच वेळी अंतिम रेष पार केली. अवघ्या १४ दशांश सेकंदाने पूर्वाला रूपेरी यशाने हुलकावणी दिली. 2.18.38 वेळ देत आरनाने रौप्‍य, तर 2.18.52 वेळ नोंदवून पूर्वाने कांस्यपदक जिंकले.

साताऱ्यातील दिक्षा आणि सिंधूदुर्गच्‍या पूर्वा या दोन्‍ही खेळाडू पुण्यातील शासनाच्‍या क्रीडा प्रबोधिनीत सराव करतात. 50 मीटर फ्रीस्‍टाईल खेलो इंडिया विद्यीपीठ स्‍पर्धेतही दिक्षाने पदक जिंकले आहे. मुलांच्‍या स्‍विमथॉन प्रकारातही महाराष्ट्रचे जलतरणपटू चकमले. चैतन्‍य शिंदेने 2.13.14 वेळ देत कांस्यपदकाचे यश संपादन केले. कर्नाटकच्‍या रेणुकाचार्या होदमानीने सुवर्ण, तर पश्चिम बंगालच्‍या पृथ्वी भट्टाचार्याने रौप्‍यपदक कमवले. महाराष्ट्रातील विजेत्‍यांची भेट घेत पथकप्रमुख नवनाथ फडतरे, क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

घोघला समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेल्‍या पारंपारिक पेंचक सिलट प्रकारात महाराष्ट्राच्‍या रिया चव्‍हाण व प्राजक्‍ता जाधव या जोडीने सुवर्णपदकाला गवसणी घातली, या पदकाने महाराष्ट्राचे सुवर्णपदकाचे खाते उघडले. 555 गुणांची कमाई करीत रिया-प्रातक्‍ता जोडीने गंडा प्रकारात सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन घडवले. मणिपूरने 552 गुणांसह रौप्य, तर कर्नाटकने 542 गुणांसह कांस्यपदकांवर नाव कोरले. एकेरीत महाराष्ट्राच्‍या किर्णाक्षी येवलेने कांस्यपदकाची कमाई केली आहे.

बीच सेपक टकरा स्‍पर्धेतील दुसऱ्या लढतीत महाराष्ट्राला विजय गवसला. महाराष्ट्राने राज्यस्थानला 2-0 असे सरळ सेटमध्ये पराभूत करून स्‍पर्धेतील आपले आव्‍हान कायम राखले. कबड्डी मैदानातही महाराष्ट्राचा जयजयकार घुमला. महाराष्ट्राच्‍या दोन्‍ही संघांनी यजमान दीम दमणला पराभूत केले. महिला संघाने दीव संघाचा 80-11 गुणांनी धुव्‍वा उडविला, तर पुरूष संघाने दीव संघावर 73-36 गुणांनी दणदणीत विजय संपादन केला.

स्‍पर्धेच्‍या तिसऱ्या दिवशी 2 सुवर्ण, 2 रौप्‍य आणि 5 कांस्यपदके जिंकून महाराष्ट्र पदकतक्‍यात तिसऱ्या स्‍थानावर आहे. यजमान दीव-दमण 3 सुवर्णांसह एकूण 4 पदकांसह अव्‍वल स्‍थानी आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Jyoti Malhotra : पाकची हेर ज्योती मल्होत्राची 4 वेळा मुंबईवारी, गर्दीच्या ठिकाणी जाऊन… Jyoti Malhotra : पाकची हेर ज्योती मल्होत्राची 4 वेळा मुंबईवारी, गर्दीच्या ठिकाणी जाऊन…
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेली हरियाणाच्या हिसारमधील ज्योति मल्होत्रा हिला अटक करण्यात आली असून पंजाब पोलीस तिची कसून चौकशी करत...
‘मंत्र्याचे पीए खोलीस लॉक लावून पळून गेले…’, धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातील रक्कम प्रकरणात संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
‘कोर्ट’ फेम वीरा साथीदारांच्या पत्नीविरोधात गुन्हा; पाकिस्तानी कविता वाचून प्रक्षोभक वक्तव्ये केल्याचा आरोप
एक तीर दो निशान.. ऐश्वर्या रायच्या भांगेतील ‘सिंदूर’ने जगाला अन् ट्रोलर्सना दिलं चोख उत्तर
मृत्यूच्या दारातून परत आलो…; दिल्ली-श्रीनगर विमानात असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितला थरारक अनुभव
चालता हो! पत्रकाराच्या प्रश्नावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भडकले, पत्रकारावर घेतले तोंडसुख
पावसाळ्यात किचनमध्ये येणाऱ्या माशांना कंटाळलात? मग करा हे साधे सोपे घरगुती उपाय