क्या हुआ तेरा वादा? शेतकर्यांच्या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी उद्यापासून शिवसेनेचे मराठवाड्यात आंदोलन
सत्ता मिळवण्यासाठी निवडणूक प्रचारात महायुती सरकारने शेतकर्यांना अनेक आमिषे दाखवली होती. मात्र सत्ता मिळताच शेतकर्यांना वार्यावर सोडणार्या सरकारला शिवसेना ‘क्या हुआ तेरा वादा?’ असा सवाल करणार आहे. 5 जून ते 12 जून या कालावधीत संपूर्ण मराठवाड्यात या आंदोलनाचे रान पेटणार आहे. या आंदोलनात शेतकर्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना पदाधिकार्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
असे होणार आंदोलन…
5 जून
जिल्हाधिकारी, तहसीलदार, ग्रामविकास अधिकारी, तलाठी यांना निवेदन.
6, 7 जून
सत्ताधारी पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार यांना पारंपारिक वाद्यांच्या गजरात ‘क्या हुआ तेरा वादा? असा सवाल करून निवेदन.
8, 9, 10 जून
शिवसेना पदाधिकारी दररोज पाच गावात बैठका घेऊन शेतकर्यांशी संवाद साधणार, सरकारने केलेल्या फसवणुकीची माहिती देणार…
11 जून
तालुक्याच्या ठिकाणी बैलगाडी, टॅ्रक्टर मोर्चा
12 जून
जिल्हास्तरीय ‘चक्का जाम’ आंदोलन
महायुती सरकारने केलेले वादे
– शेतकर्यांना कर्जमुक्त करणार, शेतकरी सन्मान योजनेतून 15 हजार रुपये देणार.
– लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार.
– 45 हजार गावांमध्ये पाणंद रस्ते.
– खतांवर एसजीएसटी अनुदानाच्या स्वरूपात परत करणार.
– वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपये देणार.
– शेतीला 24 तास वीज देणार.
– शेतमालाला हमीभाव देणार.
– बी, बियाणांच्या किंमती नियंत्रणात ठेवणार.
-हर घर जल, हर घर छत.
– मराठवाडा वॉटर ग्रीडला केंद्राकडून मान्यता मिळवणार.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List