IND Vs ENG 3rd Test – ऋषभ पंतच्या विस्फोटक अंदाजामुळे Viv Richards यांचा विक्रम मोडित
ऋषभ पंतने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावरही आपला विस्फोटक अंदाज कायम ठेवला आहे. पहिल्या डावात फलंदाजी करत असताना ऋषभ पंतने केएल राहुलच्या सोबतीने टीम इंडियाचा डाव सावरला. त्याने आक्रमक शैलीत फलंदाजी करत 74 धावांची खेळी केली. 112 चेंडूंचा सामना करत त्याने 8 चौकार आणि 2 षटकार ठोकले आहेत. त्याच्या याच षटकारांमुळे वेस्ट इंडिजचे दिग्गज माजी खेळाडू विव्ह रिचर्ड्स यांचा विक्रम मोडित निघाला आहे.
ऋषभ पंतने लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ऋषभ पंतने पहिल्या डावात फलंदाजी करत असताना 2 षटकार ठोकले. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध ऋषभ पंतच्या नावावर सर्वाधिक 35 षटकारांची नोंद झाली आहे. याबाबतीत त्याने विव रिचर्ड्स यांचा 34 षटाकारांचा विक्रम मोडित काढला आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंचा विचार केला तर आता ऋषभ पंत (35 षटकार) पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर विव्ह रिचर्ड्स (34), टिम साउदी (30), यशस्वी जयसवाल (27) आणि शुभमन गिल (26) या खेळाडूंचा समावेश आहे.
IND Vs ENG 3rd Test – केएल राहुलने हिंदुस्थानचा डाव सावरला; ठोकलं खणखणीत शतक
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List