IND Vs ENG 2nd Test – यंग ब्रिगेडचा नेत्र’दीप’क विजय; अफलातून कामगिरी करत एजबॅस्टनच मैदान मारलं, इंग्लंडचा उडवला धुव्वा
एजबॅस्टनवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने अफलातून खेळाचे प्रदर्शन करत 336 धावांनी इंग्लंडला धुव्वा उडवला आहे. आकाश दीपच्या घातक माऱ्यापुढे इंग्लंडच्या फलंदाजांना निभाव लागला नाही. पहिल्या डावात दमदार खेळी करणारे फलंदाज दुसऱ्या डावात सपशेल अपयशी ठरले. आकाश दीपने 6 विकेट घेत नेत्रदीपक कामगिरी करत हिंदुस्थानचा विजय निश्चित केला. त्यामुळे टीम इंडियाने इंग्लंडला दिलेल्या 608 धावांच्या आव्हनाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव 271 धावांवर आटोपला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबर साधली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List