Navi Mumbai Fire – APMC मार्केट जवळील ट्रक टर्मिनलला भीषण आग; अनेक गाड्या जळून खाक

Navi Mumbai Fire – APMC मार्केट जवळील ट्रक टर्मिनलला भीषण आग; अनेक गाड्या जळून खाक

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटजवळ असलेल्या तुर्भे ट्रक टर्मिनलला रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. आगाची माहिती मिळताच नवी मुंबई अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करून तब्बल 3 तासांनी या आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या आगीमध्ये अनेक गाड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने यात कोणताही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्रीच्या सुमारास ट्रक टर्मिनलवर उभ्या ट्रक आणि माल वाहतूक कंटेनर्सला आग लागली. लाकडी कॅरेट आणि प्लास्टिकमुळे आग वेगाने पसरली. काही क्षणात आगीने उग्र रुप धारण केले आणि परिसरात धुराचे लोट उठले. यामुळे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमन दलाला याबाबत माहिती देण्यात आली.

आगीनंतर काही स्फोटाचे आवाजही ऐकू आले. यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवले. त्यानंतर तब्बल तीन तास पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणण्यात आली.

दरम्यान, या आगीमध्ये 8 ते 10 ट्रक, टेम्पो जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीमुळे कोट्यवधीचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बंगाली भाषेवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही, भाषेच्या वादावरून ममता बॅनर्जी भाजपवर संतापल्या बंगाली भाषेवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही, भाषेच्या वादावरून ममता बॅनर्जी भाजपवर संतापल्या
तृणमूल काँग्रेसने सोमवारी पश्चिम बंगालमध्ये ‘शहीद दिवस’ रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ते लोकसभा खासदार अभिषेक...
प्रकाश राज, विजय देवरकोंडा आणि राणा दग्गुबती यांना ईडीने बजावले समन्स; काय आहे प्रकरण?
Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की…
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा राजीनामा, प्रकृती अस्वास्थ्याचे दिले कारण
गुप्तधनाच्या हव्यासातून 60 लाखांचा गंडा; 10 हजार अत्तराच्या बाटल्या, एक हजार नारळ आणि 10 हजार सिगारेट्स जाळल्या
Ratnagiri News – चाकरमान्यांना बाप्पा पावला! 23 ऑगस्टपासून कोकण रेल्वे मार्गावरून धावणार रो-रो कार सेवा
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास तातडीने सुरू न झाल्यास, महाराष्ट्र बंद करू; जरांगे पाटील यांचा इशारा