अँड्रॉइड युजर्सची हेरगिरी गुगलला महागात, युजर्सना मिळणार 2600 कोटी रुपयांची भरपाई

अँड्रॉइड युजर्सची हेरगिरी गुगलला महागात, युजर्सना मिळणार 2600 कोटी रुपयांची भरपाई

गुगलला अँड्रॉइड युजर्सची हेरगिरी महागात पडली आहे. कॅलिफोर्नियाच्या कोर्टाने गुगलला 2600 कोटींचा दंड ठोठावला आहे. अँड्रॉइड युजर्सकडून विनापरवानगी डेटा घेतल्याप्रकरणी गुगलला मोठा धक्का बसला आहे. गुगलवरील कारवाईचे प्रकरण 2019 सालापासून सुरू झाले आहे. अनेक युजर्सनी गुगलवर फोन वापरात नसतानाही परवानगीशिवाय युजर्सच्या फोनमधून डेटा गोळा केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी राज्य न्यायालय सॅन होजे यांनी अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्सच्या बाजूने निर्णय दिला.

कॅलिफोर्नियामध्ये टेक कंपनी गुगलला मोठा कायदेशीर निर्णय घेत 314.6 मिलियन डॉलर (सुमारे 2,600 कोटी) नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. हे फक्त कॅलिफोर्निया युजर्सचे प्रकरण होते. आता अमेरिकेतील अँड्रॉइड युजर्ससाठी फेडरल स्तरावर खटला सुरू आहे, ज्याची सुनावणी 2026 मध्ये सुरू होईल. तिथे गुगल दोषी आढळल्यास त्याला मोठा दंड भरावा लागू शकतो.

गुगलने काय म्हटले आहे?

अँड्रॉइड डिव्हाइसेसची कामगिरी, सुरक्षा आणि विश्वासार्ह काम राखण्यासाठी या डेटा ट्रान्सफरची आवश्यकता असल्याचे गुगलचे स्पीकर जोस कॅस्टानेडा यांनी सांगितले. हा डेटा पाठवण्यासाठी फोटो पाठवण्यापेक्षा कमी डेटा खर्च होतो. युजर्सनी अटी आणि शर्ती स्वीकारल्या होत्या आणि या हस्तांतरणास परवानगी दिली होती. तरीही न्यायालयाने युजर्सचा मुद्दा अधिक गंभीर मानत गुगलला दोषी ठरवले.

गुगलवर नेमके आरोप काय?

या प्रकरणात गुगलवर अनेक आरोप झाले होते. गुगलने फोनला अशा प्रकारे प्रोग्रॅम केले की, वाय-फाय नसतानाही डेटा गुगलच्या सर्व्हरवर पाठवला जात असे. म्हणजेच युजर्सचा मोबाईल डेटा खर्च होत राहिला, ज्याचे बिल युजरला भरावे लागले. या डेटाचा वापर आपली डिजिटल जाहिरात सेवा, लोकेशन मॅपिंग आणि टार्गेटेड जाहिराती सुधारण्यासाठी केल्याचा आरोपही गुगलवर करण्यात आला होता.

न्यायालयाचे म्हणणे

कोर्टाने म्हटले की, गुगलने युजर्सवर बोजा टाकला, ज्यामुळे युजर्सची गोपनीयता आणि खर्च या दोन्हींवर परिणाम झाला. गुगलने हे सर्व आपल्या कॉर्पोरेट फायद्यासाठी केले आहे, युजर्सच्या सेवेसाठी नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की… Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की…
भारतात आयुर्वेदानुसार उपचार वैदिक काळापासून सुरु आहे. लोक पहिल्यापासून आरोग्याच्या समस्यांवर जडी-बुटींचा वापर करायचे.परंतू आता काळानुसार इंग्रजी औषधांवर अवलंबून आहेत....
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा राजीनामा, प्रकृती अस्वास्थ्याचे दिले कारण
गुप्तधनाच्या हव्यासातून 60 लाखांचा गंडा; 10 हजार अत्तराच्या बाटल्या, एक हजार नारळ आणि 10 हजार सिगारेट्स जाळल्या
Ratnagiri News – चाकरमान्यांना बाप्पा पावला! 23 ऑगस्टपासून कोकण रेल्वे मार्गावरून धावणार रो-रो कार सेवा
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास तातडीने सुरू न झाल्यास, महाराष्ट्र बंद करू; जरांगे पाटील यांचा इशारा
टेकऑफ दरम्यान तांत्रिक बिघाड, एअर इंडियाच्या दिल्ली-कोलकाता विमानाचे उड्डाण रद्द
माणिकराव कोकाटे यांचं वर्तन चुकीचं, मुख्यमंत्री फडणवीस यांचं विधान