‘गुतंवणूकदार’ मालामाल! सेन्सेक्समध्ये 700 अंकांची उसळी; 4 लाख कोटींचा झाला फायदा

‘गुतंवणूकदार’ मालामाल! सेन्सेक्समध्ये 700 अंकांची उसळी; 4 लाख कोटींचा झाला फायदा

शेअर बाजाराने बुधवारी जोरदार उसळी घेतली. सेंसेक्स 700 अंकांनी वधारून 82,559.84 वर बंद झाला, तर निफ्टी 187.50 अंकांनी वाढून 25,244.55 च्या पातळीवर पोहोचला. या तेजीमुळे बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 450 लाख कोटींवरून 454 लाख कोटींवर गेले, ज्यामुळे गुंतवणूकदारांना एका दिवसात सुमारे 4 लाख कोटींचा नफा मिळाला.

आज दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स 82,448 वर उघडला आणि दिवसाच्या अखेरीस 0.85 टक्क्यांच्या वाढीसह 82,755 वर बंद झाला. म्हणजेच एकूण 707 अंकांची वाढ झाली. दुसरीकडे निफ्टी 25,150 वर उघडला आणि 0.50 टक्क्यांच्या वाढीसह 25,244 वर बंद झाला. या दोन्ही निर्देशांकांमधील वाढीमुळे बाजारात उत्साह निर्माण झाला.

बाजारातील या तेजीचा सर्वाधिक फायदा गुंतवणूकदारांना झाला. बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल मागील सत्रातील 450 लाख कोटी रुपयांवरून 454 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. म्हणजेच गुंतवणूकदारांनी फक्त एका दिवसात 4 लाख कोटी रुपयांचा नफा कमावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;