रतन टाटांच्या मृत्युपत्रात उल्लेख नसलेल्या शेअर्सचे काय होणार? मुंबई उच्च न्यायालयाने केले स्पष्ट 

रतन टाटांच्या मृत्युपत्रात उल्लेख नसलेल्या शेअर्सचे काय होणार? मुंबई उच्च न्यायालयाने केले स्पष्ट 

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांनी त्यांचे मृत्युपत्र लिहिले होते. त्यांच्या मृत्युनंतर मृत्युपत्रात नमूद केल्यानुसारच, मालमत्ता आणि इतर गोष्टींचे वाटप करण्यात आले होते. परंतु रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्युपत्रात मात्र शेअर्सचा कोणताही उल्लेख केला नव्हता. त्यामुळे आता या शेअर्सचे काय होणार? कुणाच्या नावावर जाणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते.

हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर, सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आदेश दिला आहे की, रतन टाटा यांच्या सूचीबद्ध आणि अनलिस्टेड शेअर्सची मालकी आता रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्टकडे असेल. न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे.

यासंदर्भात अधिक बोलताना न्यायमूर्ती मनीष पितळे म्हणाले की, ज्या गोष्टी रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्युपत्रात नमूद केल्या नव्हत्या, त्यांची मालकी त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांकडे असावी. खंडपीठाने म्हटले की, रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्टची स्थापना रतन टाटा यांनी स्वतः केली होती. न्यायालयाने म्हटले की, रतन टाटांनी त्यांच्या मृत्युपत्रात उल्लेख केलेले सूचीबद्ध आणि अनलिस्टेड शेअर्स त्यांच्या दोन्ही ट्रस्टमध्ये समान प्रमाणात विभागले गेले आहेत. या प्रकरणात एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि न्यायालयाला रतन टाटांच्या शेअर्सच्या मालकीबाबत निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली होती.

खंडपीठात उपस्थित झालेला मुख्य प्रश्न असा होता की, रतन टाटा यांनी त्यांच्या मूळ मृत्युपत्रात या शेअर्सबद्दल काहीही सांगितले नव्हते, परंतु 22 डिसेंबर 2023 ला मृत्युपत्रामध्ये एक सुधारणा करण्यात आली. यानंतर सुधारित मृत्युपत्रात असे म्हटले होते की, रतन टाटांच्या इतर सर्व मालमत्ता दोन भागात विभागून रतन टाटांच्या दोन ट्रस्टना देण्यात याव्यात. यामध्ये सूचीबद्ध आणि अनलिस्टेड शेअर्सचाही समावेश करण्यात आलेला होता.

रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले. त्यांचा कुटुंबातील कोणताही वारस नव्हता आणि ते अविवाहित होते. देशातील औद्योगिक जगात रतन टाटा यांचे नाव आदराने घेतले जाते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;