युवकाच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या, आरोपी फरार

युवकाच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या, आरोपी फरार

युवकाच्या जाचाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. या प्रकरणातला आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वाशिम जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.

वाशिमच्या शिरपूर तालुक्यातील वाघळूद गावात अभिषेक देशमुख या युवकाने या अल्पवयीन मुलीच्या घरात घुसखोरी केली. त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्तीने सेल्फी काढायला सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता या अभिषेकने या मुलीला लग्नाची मागणी घातली. मुलीने या अभिषेकला थेट नकार दिला. तरी त्याने मुलीला त्रास दिला. या त्रासाला कंटाळून या मुलीने राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आरोपीला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;