ठाणे पालिकेच्या भ्रष्टाचाराची पहिली विकेट पडली; तत्कालीन सहाय्यक आयुक्त फारूख शेख निलंबित, न्यायालयाच्या दणक्यानंतर आयुक्त ‘इन अॅक्शन

ठाणे पालिकेच्या भ्रष्टाचाराची पहिली विकेट पडली; तत्कालीन सहाय्यक आयुक्त फारूख शेख निलंबित, न्यायालयाच्या दणक्यानंतर आयुक्त ‘इन अॅक्शन

न्यायालयाच्या दणक्यानंतर मुंब्याच्या खान कंपाऊंडमधील 17 बेकायदा टॉवर्सवर ठाणे पालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या बांधकामांमधून कोटींची उलाढाल झाली असल्याची माहिती समोर येताच ठाणे महापालिकेच्या भ्रष्टाचाराची पहिली विकेट पडली आहे. बेकायदा बांधकामांप्रकरणी दिव्याचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त फारूख शेख यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पालिका आयुक्त सौरभ राव यांनी शेख यांचे तडकाफडकी निलंबन केले आहे. दरम्यान, एकीकडे या प्रकरणाची चौकशी सुरू असताना न्यायालयाच्या दणक्यानंतर पालिका आयुक्त ‘इन अ‍ॅक्शन’ झाले आहेत.

केवळ स्वाक्षरी करण्यासाठी यायचे
या प्रकरणात अनेक गंभीर बाबी उघड झाल्यानंतर अखेर महापालिका सौरभ राव यांनी फारूख शेख यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. फारूख शेख यांना पुढील आदेश येईपर्यंत महापालिका मुख्यालयात केवळ स्वाक्षरी करण्यासाठी यावे लागणार असल्याचे या निलंबनाच्या आदेशात नमूद केले आहे.

मुंब्र्याच्या खान कंपाऊंडमधील 17 बेकायदा इमारतींप्रकरणी न्यायालयीन चौकशी सुरू झाली आहे. ठाणे सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून झाडाझडती करण्यात येत असल्याने पालिकेचे अनेक आजी-माजी अधिकारी गॅसवर आहेत. दिवा प्रभाग समितीचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त फारूख शेख अनधिकृत बांधकामाला आश्रय दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. फारूख शेख यांनी बेकायदा बांधकामांना पाठीशी घालण्यासाठी दरपत्रक निश्चित केले होते. शिवाय प्रतिचौरस मीटर २०० रुपये आकारले जातात, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.

500 कोटींची उलाढाल
बांधकामांबाबत सुरू असलेल्या चौकशीमधून आणि याचिकाकत्यांनी जे दोषारोप लावले आहेत त्यामधून अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. या 17 बेकायदा बांधकामांमधून 500 कोटींची उलाढाल झाली असल्याची माहिती समोर आल्यानंतर पालिकेतील आकाची पळापळ सुरू झाली आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर 12 जून रोजी प्रत्यक्ष जागेवर पाहणी केल्यानंतर काही बाबीदेखील समोर आल्या आहेत. विश्वास बसणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बांधकाम झाले असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;