हिंदुस्थानात जाहिरातीच्या शुटिंगसाठी आलेल्या फ्रेंच महिलेवर बलात्कार, आरोपीला अटक

हिंदुस्थानात जाहिरातीच्या शुटिंगसाठी आलेल्या फ्रेंच महिलेवर बलात्कार, आरोपीला अटक

राजस्थानमध्ये एका फ्रेंच महिलेवर बलात्कार झाला आहे. आरोपीने पीडित महिलेला आपल्या घरी नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उदयपूरमध्ये एक फ्रेंच महिला आपल्या दोन मैत्रिणींसोबत एका हॉटेलमध्ये जेवायवला आले होते. त्याच हॉटेलमध्ये एका इव्हेंट मॅनेजमेंटचे काही कर्मचारी जेवायला आले होते. पीडित महिला उदयपूरमध्ये एका जाहिरातीच्या शुटिंगसाठी आली होती. याच कंपनीचे कर्मचारीही तिथे आले होते. पीडित महिला नोव्हेंबरपासून हिंदुस्थानात होती, तिच्याकडे एक वर्षाचा व्हिसाही होता.

जेवल्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंटचा कर्मचारी सिद्धार्थने या महिलेला उदयपूर दाखवण्याचा आग्रह केला. त्यासाठी त्याने एक टॅक्सीही बुक केली होती. फिरून आल्यानंतर पुन्हा हॉटेल रुमवर सोडून देऊ असे त्याने सांगितले. त्यानंतर सिद्धार्थने तिला आपल्या घरी नेले. तेव्हा सिद्धार्थने तिच्यावर बलात्कार केला आणि सकाळी सहाच्या सुमारास तिला आपल्या हॉटेलच्या रुमवर आणून सोडले.

पीडित महिलेने ही बाब आपल्या मैत्रिणींना सांगितली. तेव्हा त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि झाला प्रकार सांगितला. पोलिसांनी महिलेची वैद्यकीय चाचणी केली आणि सिद्धार्थविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सिद्धार्थला अटक केली असून त्याची रवानगी तुरुंगात केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;