आर्थर रोड तुरुंगाचा झाला कोंडवाडा, 999 कैद्यांची क्षमता असताना भरलेत 3 हजार 461 कैदी

आर्थर रोड तुरुंगाचा झाला कोंडवाडा, 999 कैद्यांची क्षमता असताना भरलेत 3 हजार 461 कैदी

मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात सध्या क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. या तुरुंगाची क्षमता ही 999 इतकी आहे. पण या तुरुंगात सध्या 3 हजार 461 कैदी आहेत. याच तरुंगातील आरोपीने आपल्या सुरक्षिततेसाठी दुसऱ्या तुरुंगात हलवण्यात यावे अशी मागणी केली होती. तेव्हा ही बाब समोर आली आहे.

1993 मुंबई स्फोट प्रकरणातील आरोपी मुन्नाफ हलारी याने अंडा सेलमध्ये आपल्याला हलवण्यात यावं अशी मागणी केली होती. सर्वसामान्य कैद्यांसोबत असताना प्रतिस्पर्धी टोळ्यांकडून आपल्याला जिवाचा धोका आहे असा दावा हलारी याने केला आहे. पण कोर्टाने हलारीची मागमी फेटाळून लावली आहे. तसेच हलारीला इतर विभागत ठेवून पुरेशी सुरक्षा द्या असे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत.

मुन्नाफ हलारीला 29 फेब्रुवारी 2020 रोजी अटक झाली होती आणि तो सुरुवातीला साबरमती जेलमध्ये होता. नंतर 2 जून 2025 रोजी त्याला मुंबईत हलवले गेले. सरकारी वकिलाने सांगितले की, एखाद्या आरोपीला अंडा सेलमध्ये जास्त काळ ठेवल्यास महाराष्ट्र तुरुंग नियमांचे उल्लंघन होईल आणि याबाबत आपण अधीक्षकाकडून अहवाल मागविण्यात आल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. अधीक्षकांनी कोर्टात सांगितले की, सामान्य विभागाप्रमाणे जास्त सुरक्षा असलेल्या सेलमध्येही कैद्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. हा सेल 31 कैद्यांसाठी आहे, पण सध्या तेथे 43 कैदी आहेत, त्यात बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी, दहशतवादी कारवायांतील गुन्हेगार आणि प्रसाद पुजारी, उदय पाठक यांसारखे टोळी प्रमुख असल्याचे त्यांनी सांगितले.

अधीक्षकांनी म्हटले की, अंडा सेलमध्ये हलारीला ठेवणे अधिक धोका निर्माण करू शकतो आणि त्याच्या सुरक्षिततेसाठी तो वेगळ्या विभागात ठेवणेच योग्य राहील, जसे की इतर सह-आरोपींसोबत केले आहे. कोर्टाने या सगळ्या बाबींचा विचार करून, तुरुंगातील गर्दी व धोका लक्षात घेतला आणि सांगितले की, तुरुंग प्रशासन व अधीक्षकच कैद्यांची सुरक्षितता ठरवण्यात सर्वाधिक सक्षम आहेत आणि त्यांनीच योग्य उपाय करावेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;