मी पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवत आहे…; पतीने व्हिडिओ बनवत उचललं टोकाचं पाऊल

मी पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवत आहे…; पतीने व्हिडिओ बनवत उचललं टोकाचं पाऊल

पत्नीचे अनैतिक संबंध, नवरा बायकोमधील वाद किंवा कुटुंबाचा हस्तक्षेप यांसराख्या कारणांवरून पतीच्या हत्येचे किंवा आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशातच हरयाणातील रोहतक येथे धक्कादायक घटना घडली. पत्नीने तिच्या प्रियकरासोबत एक रील व्हिडीओ बनवला आणि तो नवऱ्याला पाठवला. तो व्हिडीओ पाहून बायकोचे विवाहबाह्य संबंध असल्याचा राग त्याला अनावर झाला आणि याच नैराश्यातून गळफास घेत आपले जीवन संपवले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रोहतक जिल्ह्यातील दोभ गावातील आहे. महिलेने तिच्या प्रियकरासोबतचा व्हिडिओ बनवून पतीला पाठवला तेव्हा त्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. पण मरण्यापूर्वी त्याने 4 मिनिटे 2 सेकंदांचा व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडीओतून त्याने आपल्या मृत्युसाठी पत्नी आणि तिच्या प्रियकराला जबाबदार धरले आहे.

आत्महत्येपूर्वी तरुणाने व्हिडिओ बनवून अनेक मोठी गोष्टी उघड केल्या. मगन असे मृत व्यक्तीचे नाव असून दिव्या असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. तर दीपक असे त्याच्या पत्नीच्या प्रियकराचे नाव आहे. दीपक हा हरयाणा पोलिसात कार्यरत आहे. माझी पत्नी दिव्या आणि दीपक माझ्यावर दबाव आणत आहेत आणि माझ्याकडून वारंवार पैसे मागत आहेत. म्हणून मी टोकाचे पाऊल उचलत आहे, असे तो म्हणाला.

पत्नीच्या प्रियकराला प्रमोशनसाठी 5 लाख रुपये हवे होते. यानंतर माझ्या पत्नीने माझ्यावर दबाव आणला. या दबावाखाली मी माझी जमीन आणि काही दागिने विकले. आणि 5 लाख रुपये माझ्या पत्नीच्या खात्यात पाठवले. यानंतर दुसऱ्याच दिवशी तिने हे पैसे दीपकला पाठवले. यानंतर तिने आणखी दीड लाखांची मागणी केली. जर मी त्यांना पैसे दिले नाही तर ते माझ्या कुटुंबाला म्हणजेच माझ्या वडिलांना मारून टाकतील, अशी धमकी त्या दोघांनी मला दिली होती.

मी माझ्या वडिलांना मारू शकत नाही, त्यामुळे मीच माझे जीवन संपवत आहे, असे मृत मगनने त्याच्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. मगनच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या आणि दिव्याच्या लग्नापूर्वी दिव्याचे आणखी एक लग्न झाले होते. आणि तिला एक मुलगा देखील आहे. आमच्या लग्नाच्या वेळी तिने तिच्या पूर्वाश्रमीच्या नवऱ्यासोबत घटस्फोटही घेतला नव्हता, असा धक्कादायक दावा मगनने व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे.

मी माझ्या पत्नीच्या आणि तिच्या प्रियकराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवत आहे. त्यामुळे माझ्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही योग्य ती शिक्षा द्यावी आणि माझ्या मुलाला माझ्या कुटुंबाकडे सुपुर्द करावे, असेही मगनने व्हिडीओमध्ये आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;