हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी, पुरामळे हाहाकार; दोघांचा मृत्यू, दहा बेपत्ता
हिमाचल प्रदेशमधील कुल्लू आणि कांग्रा जिल्ह्यात ढगफुटी झाली असून अनेक भागात भूस्खलन झाले आहे.ढगफुटीमुळे नद्यांना पूर आला असून यात अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. यात दोघांचा मृत्यू झाला आहे तर दहा जण बेपत्ता आहेत.
कांग्रा जिल्ह्यातील खानियारा गावात एका वीज प्रकल्पाच्या ठिकाणी ढगफुटीनंतर निर्माण झालेल्यात पूरात अनेक काही प्रकल्पात काम करणारे काही मजूर वाहून गेले आहेत.
ढगफुटी झाल्यानंतरचा तेथील एक व्हिडिओ देखील समोर आला असून त्यात पूरामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून नदीचे रौद्ररुप या व्हिडीओत पाहायला मिळत आहेत. या नदीतून एक छोटा ट्रक देखील वाहून गेल्याचे दिसत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List