मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी रामबाण ठरतील हे 6 सुपरफूड, तुमच्या घरी सहज असते उपलब्ध

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी रामबाण ठरतील हे 6 सुपरफूड, तुमच्या घरी सहज असते उपलब्ध

डायबिटीस म्हणजेच मधुमेह हा आजार सध्या जगभर झपाट्याने वाढतो आहे. एकदा हा आजार झाला की, तो पूर्णपणे बरा होणं शक्य नसतं, मात्र योग्य आहार आणि जीवनशैलीच्या मदतीने त्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकतं. विशेषतः उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होतं आणि ब्लड शुगर लेव्हल झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. अशा वेळी डाएटमध्ये योग्य अन्नपदार्थांचा समावेश केल्यास मधुमेह नियंत्रणात राहतो आणि शरीरही ताजंतवानं राहतं.

साखर नियंत्रणासाठी कोणते फूड्स फायदेशीर?

1. ओट्स (Oats)

ओट्स हा एक लो-ग्लायसेमिक इंडेक्स फूड आहे, म्हणजेच यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढत नाही. ओट्समध्ये असणारा फायबर शरीरात साखरेचे शोषण हळूहळू करतो. यामुळे शुगर नियंत्रणात राहते. शिवाय, ओट्समुळे वजन कमी होण्यास मदत होते आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही ते फायदेशीर ठरतं.

2. कारलं

कारले हा मधुमेहींसाठी सुपरफूड मानला जातो. यामध्ये अ‍ॅक्टिव्ह कंपाऊंड्स असतात जे शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतात. हे ब्लड शुगर कमी करण्यास मदत करतं. कारले पचनक्रिया सुधारण्यातही उपयुक्त आहे.

3. दुधी

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी आणि हायड्रेटेड राहण्यासाठी लौकी एक चांगला पर्याय आहे. यामध्ये भरपूर पाणी असतं आणि फारच कमी कॅलोरी. मधुमेहींसाठी दुधी खाणं फायदेशीर ठरतं कारण हे साखर नियंत्रणास मदत करतं, वजन घटवण्यास उपयुक्त ठरतं आणि पचनतंत्रही सुधारतं.

4. बेरी

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी यासारख्या बेरीज अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरने भरलेल्या असतात. यामुळे शरीरात इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होतं आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते. बेरीज इम्युनिटी सुधारतात आणि हृदयासाठीही फायदेशीर असतात.

5. काकडी

काकडी हा उन्हाळ्यातील सर्वात उपयुक्त आणि सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे. यामध्ये सुमारे ९५% पाण्याचं प्रमाण असतं, जे शरीराला डिहायड्रेट होण्यापासून वाचवतो. काकडी खाल्ल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो, वजन नियंत्रणात राहतं आणि डायबिटीसवरही नियंत्रण ठेवण्यास मदत होते. यामधील पोषणमूल्य त्वचेसाठीही फायदेशीर ठरतं.

6. भरपूर फायबरयुक्त आहार

डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या रोजच्या आहारात फायबरयुक्त गोष्टींचा समावेश आवर्जून करावा. फायबर पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढवते. फळं, भाज्या, संपूर्ण धान्य यामध्ये फायबर अधिक प्रमाणात असतो.

आहारासोबतच या गोष्टी देखील करा फाॅलो 

डायबिटीसवर नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ आहार पुरेसा नाही. रोज किमान ३० मिनिटांचा व्यायाम, ८-९ तासांची पुरेशी झोप आणि स्ट्रेस मॅनेजमेंटसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल