Axiom Mission 4 – हिंदुस्थानसाठी दुसरा ‘राकेश शर्मा’ क्षण! शुभांशू शुक्ला 41 वर्षांनंतर अंतराळासाठी रवाना

Axiom Mission 4 – हिंदुस्थानसाठी दुसरा ‘राकेश शर्मा’ क्षण! शुभांशू शुक्ला 41 वर्षांनंतर अंतराळासाठी रवाना

शुभांशू शुक्ला 25 जूनला अ‍ॅक्सिओम मिशन-4 सह आयएसएससाठी रवाना झाले आहेत. हा हिंदुस्थानसाठी दुसरा राकेश शर्मा क्षण आहे. लाँच पॅड 39 ए वरून प्रक्षेपित झाला आहे. हिंदुस्थानसाठी हा आणखी एक अभिमानाचा क्षण आहे. भारतीय हवाई दलाचे अनुभवी चाचणी पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे अ‍ॅक्सिओम मिशन-4 (अ‍ॅक्स-4) अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी (ISS) रवाना झाले आहेत.

25 जूनला फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरच्या लाँच पॅड 39 A वरून स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटने हे मिशन सुरू केले. हवामान परिस्थिती 90% अनुकूल असल्याचे वृत्त आहे जे या ऐतिहासिक उड्डाणासाठी एक चांगले संकेत आहे.

Shubhanshu Shukla Axiom-4 – आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे! काय म्हणताहेत शुभांशूचे पालक, वाचा

1984 मध्ये राकेश शर्मा नंतर, शुभांशू हा हिंदुस्थानातील दुसरे अंतराळवीर असणार आहेत. शुभांशू शुक्ला यांना अंतराळात 7 प्रयोग करायचे आहेत. 1984 मध्ये विंग कमांडर राकेश शर्मा यांनी सोव्हिएत युनियनच्या सोयुझ टी-11 मोहिमेअंतर्गत अंतराळात पाऊल ठेवले होते. त्यांनी अंतराळात हिंदुस्थानी ध्वज फडकावला होता.

Breaking – Mission Axiom 4 ‘कमाल की राईड’ म्हणत शुंभाशू शुक्लाचा अंतराळ यानाचा प्रवास सुरू

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींशी झालेल्या संभाषणात त्यांनी सांगितले की, हिंदुस्थानसाठी हा पहिला अभिमानाचा क्षण होता. आता 41 वर्षांनंतर, शुभांशू शुक्ला हा वारसा पुढे नेणार आहेत. ते केवळ अंतराळात जाणार नाहीत, तर 14 दिवस आयएसएसवर राहून वैज्ञानिक प्रयोग देखील करणार आहेत.

अ‍ॅक्सिओम मिशन-4 (अ‍ॅक्स-4) ही एक खाजगी अंतराळ मोहीम आहे. अ‍ॅक्सिओम स्पेस, नासा आणि स्पेसएक्स यांच्या सहकार्याने राबविली जात आहे. ही मोहीम हिंदुस्थान, पोलंड, हंगेरी आणि अमेरिका यांच्यातील आंतरराष्ट्रीय सहकार्याचे प्रतीक आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;