Iran News : गद्दारांची खैर नाही! इराणने इस्रायलसाठी हेरगिरी करणाऱ्या 700 जणांना केलं अटक, तिघांना फाशी

Iran News : गद्दारांची खैर नाही! इराणने इस्रायलसाठी हेरगिरी करणाऱ्या 700 जणांना केलं अटक, तिघांना फाशी

इराणने इस्रायलच्या मोसाद गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली 700 हून अधिक लोकांना अटक केली आहे. याशिवाय बुधवारी सकाळी तीन जणांना फाशी देण्यात आली. ही कारवाई इराण आणि इस्रायल मधील 12 दिवसांच्या तीव्र संघर्षानंतर आणि अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या युद्धविरामाच्या दुसऱ्या दिवशी झाली आहे.

इराणच्या न्यायपालिकेशी संलग्न मिझान न्यूज वृत्तसंस्थेनुसार, फाशी देण्यात आलेल्या तीन व्यक्तींवर इस्रायलच्या मोसादसाठी हेरगिरी आणि हत्येसाठी उपकरणांची तस्करी केल्याचा आरोप होता. इद्रिस अली, आझाद शोजाई आणि रसूल अहमद रसूल, असं फाशी देण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांनी इराणमधील एका उच्चपदस्थ व्यक्तीच्या हत्येचा कट रचल्याचा दावा इराणी अधिकाऱ्यांनी केला आहे.

इराणच्या फार्स न्यूज वृत्तसंस्थेनुसार, 13 जूनपासून सुरू झालेल्या इराण-इस्रायल संघर्षादरम्यान ही अटक करण्यात आली. केरमानशाह, इस्फहान, खुजिस्तान, फार्स आणि लोरेस्तान प्रांतांमध्ये सर्वाधिक अटके झाल्या. अटक केलेल्यांवर इस्रायलसाठी ड्रोन चालवणे, हातबॉम्ब बनवणे, संवेदनशील लष्करी ठिकाणांचे चित्रीकरण करणे आणि ही माहिती इस्रायलली गुप्तचरांना पुरवण्याचे आरोप आहेत. याशिवाय अटके दरम्यान 1 हजारहून अधिक ड्रोन, स्फोटके, डेटोनेटर, संचार उपकरणे आणि काही अँटी-टँक क्षेपणास्त्रे जप्त करण्यात आली.

दरम्यान, 13 जून रोजी इस्रायलने इराणवर ‘रायझिंग लायन’ ऑपरेशन अंतर्गत हल्ले सुरू केले होते. या 12 दिवसांच्या संघर्षात इराणच्या फोर्डो, नतांझ आणि इस्फहान येथील अण्वस्त्र सुविधांवर अमेरिकेनेही हवाई हल्ले केले. 24 जून रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला. मात्र युद्धविरामाच्या दुसऱ्याच दिवशी इराणने ही आक्रमक कारवाई केल्याने युद्धविरामाच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

इराणने यापूर्वीही इस्रायलली गुप्तचरांविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. 16 जून रोजी माजिद मोसाय्येबी नावाच्या व्यक्तीला इस्फहानमध्ये फाशी देण्यात आली होती, तर 23 जून रोजी मोहम्मद-अमिन मेहदवी शायेस्तेह याला हेरगिरीच्या आरोपाखाली फाशी देण्यात आली. इराणच्या अधिकाऱ्यांनी इस्रायलच्या हल्ल्यांनंतर देशात गुप्तचरांचे जाळे सक्रिय झाल्याचा दावा केला होता. यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;