विना तिकीट AC कोचमध्ये शिरला, अर्धनग्न होत गोंधळ घातला; पोलिसांनी तरुणाला घेतलं ताब्यात

विना तिकीट AC कोचमध्ये शिरला, अर्धनग्न होत गोंधळ घातला; पोलिसांनी तरुणाला घेतलं ताब्यात

बंगळुरूमार्गे जाणाऱ्या कुर्ला-कोइम्बतूर एक्स्प्रेसच्या वातानुकूलित कोचमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या व्यक्तीने कोचमध्ये गोंधळ घातला. या व्यक्तीला आता अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने रेल्वे अधिकाऱ्यांसोबत असभ्य वर्तन केले आणि अर्धनग्न होत गोंधळ घातला. यावेळी रेल्वे पोलिसांनी सुरुवातीला कोणतीही कारवाई केली नाही. नंतर आंध्र प्रदेशातील गुंटकल येथे त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.

तक्रारीनुसार, ही घटना 21 जून रोजी रात्री आंध्र प्रदेशातील वाडी आणि गुंटकल दरम्यान घडली. तिकीट नसतानाही एक व्यक्ती कुर्ला-कोइम्बतूर एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये घुसला आणि त्याने असभ्य वर्तन करण्यास सुरुवात केली. कर्तव्यावर असलेल्या लेडी ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनर (टीटीई) यांनी रेल्वे प्रोटेक्शन फोर्सला (RPF) यााबाबत सूचना दिली. यानंतर कर्नाटकातील रायचूर स्टेशनवर पोहोचताच अधिकारी ट्रेनमध्ये चढले आणि त्यांनी चौकशी केली.

चोराला बुटांचा हार घातला, गाडीच्या बोनेटवर बसवून धिंड काढली! जम्मू कश्मिर पोलिसांचे कृत्य त्यांच्याच अंगलट

रेल्वे अधिकाऱ्यांनी त्या माणसाला ट्रेनमधून उरवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने त्यांच्यासमोरही असभ्य वर्तन केले. आरपीएफ अधिकारी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांसोबत बोलताना त्याने अर्धनग्न होत स्वतःचे कपडेही काढले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये प्रवाशाचे असभ्य वर्तन पाहून आरपीएफ अधिकारी कोणतीही कारवाई न करता ट्रेनमधून निघून जाताना दिसत आहेत. त्यामुळे गुन्हेगाराला शिक्षा न देता घटनास्थळावरून निघून जाणाऱ्या अधिकाऱ्यांचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात आला आहे.

दोघांना दांडक्याने मारहाण, ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास भाग पाडले…; बेंगळुरूमध्ये FIR दाखल

दरम्यान, या घटनेला कोणतेही महत्त्व न देता आरपीएफ अधिकारी निघून गेल्यामुळे घटनास्थळी उपस्थित महिला अधिकाऱ्यानी गुंटकल विभागाशी समन्वय साधला. यानंतर रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि गुंटकल येथील आरपीएफ अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला खाली उतरवले आणि ताब्यात घेतले. दरम्यान, त्या व्यक्तीची चौकशी केली असता तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांसोबत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी अद्यापही त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. तसेच आरपीएफ अधिकाऱ्यांच्या वर्तनाची चौकशी सध्या सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;