सहा दिवसांत 73 बेकायदा बांधकामांवर हातोडा, ठाण्यातील भूमाफियांचे धाबे दणाणले

सहा दिवसांत 73 बेकायदा बांधकामांवर हातोडा, ठाण्यातील भूमाफियांचे धाबे दणाणले

न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर झोपलेल्या ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आली आहे. महापालिका हद्दीत 19 ते 24 जून या सहा दिवसांत 73 बेकायदा बांधकामांवर हातोडा टाकला आहे. यामध्ये काही ठिकाणी पूर्ण इमारत, प्लिंथ, कॉलम, स्लॅब, वाढीव बांधकाम या प्रकारच्या बांधकामांचा समावेश आहे. यापुढेही बेकायदा बांधकामांवर प्रभाग समितीनिहाय कारवाई सुरूच राहणार असल्याने भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. बेकायदा बांधकामांमुळे ठाणे बदनाम झाले आहे.

घोडबंदर, कोपरी, वर्तकनगर, वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा आणि दिव्यात इमारती उभारण्याचा सपाटा सुरूच आहे. डायघर येथील खान कंपाऊंड परिसरात 17 बेकायदा इमारतीप्रकरणी उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी कठोर भूमिका घेतल्यानंतर दस्तुरखुद्द पालिका आयुक्त सौरभ राव आणि इतर अधिकाऱ्यांवर रस्त्यावर उतरून कारवाई करण्याची नामुष्की ओढवली होती. यामध्ये उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. या कारवाईसाठी पोकलेन, जेसीबी, गॅस कटर, ट्रॅक्टर ब्रेकर, मनुष्यबळ यांचा वापर करण्यात आला. पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;