Axiom -4 Mission हे हिंदुस्थानच्या स्पेस संशोधनाला नवी दिशा देणारे ठरेल, आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास

Axiom -4 Mission हे हिंदुस्थानच्या स्पेस संशोधनाला नवी दिशा देणारे ठरेल, आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास

हिंदुस्थानचा ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लासह चार अंतराळवीरांना घेऊन अ‍ॅक्सिओम-4 मिशन आज दुपारी 12.01 वाजता (IST) नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून प्रक्षेपित करण्यात आले. फॉल्कन-9 या रॉकेटद्वारे त्यांनी अवकाशात उड्डाण केलं आहे. हे मिशन चार अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) घेऊन जात आहे. या मिशनच्या यशस्वी उड्डाणानंतर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील या मोहिमेचे कौतुक केले आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत ही मोहिम भारताच्या स्पेस संशोधनाला नवी दिशा देणारी ठरेल असे म्हटले आहे. ”भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी आज Axiom-4 मिशन अंतर्गत SpaceX च्या Falcon-9 रॉकेटच्या सहाय्याने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने (ISS) उड्डाण केले आहे. ही आम्हा भारतीयांसाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. तब्बल 41 वर्षांनंतर अंतराळाच्या दिशेने झेपावणारे शुभांशू शुक्ला हे दुसरे भारतीय आहेत. 14 दिवसांची ही मोहीम भारताच्या स्पेस संशोधनाला नक्कीच नवी दिशा देणारी ठरेल”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;