Amitabh Bachchan बनवतात बेस्ट पापड! बिग बींचा फोटो दाखवत काय म्हणाली डॅनिश मुलगी? पाहा Video

Amitabh Bachchan बनवतात बेस्ट पापड! बिग बींचा फोटो दाखवत काय म्हणाली डॅनिश मुलगी? पाहा Video

डेन्मार्कमधील एका तरुणीच्या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर जोरदार रंगली आहे. ही मुलगी बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना ओळखत नाही. पण ती त्यांना शोधत आहे. पण ती का शोधतेय? हे जेव्हा तुम्हाला कळेल, तेव्हा तुम्हला हसू आवरता येणार नाही.

डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे राहणारी फ्रेडरिक नावाची तरुणी हिंदुस्थानच्या पापडाची मोठी चाहती बनली आहे. अलिकडेच तिने सोशल मीडियावर तिची आवड शेअर केली आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. खरंतर त्या परदेशी तरुणीने केवळ एका लोकप्रिय पापड ब्रँडची प्रशंसा केली नाही तर, चुकून त्या ब्रँडची जाहिरात करणारे बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना पापड बनवणारे म्हणून समजली. या गैरसमजामुळे सोशल मीडियावर मजेदार कमेंट्स येत आहेत.

फ्रेडरिकने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने लोकप्रिय पापड ब्रँडचे पॅकेट दाखवले आहे. व्हिडिओमध्ये ती पॅकेटवरील अमिताभ बच्चनच्या चित्राकडे बोट दाखवत म्हणते, ” या माणसाचे पापड खरोखरच चांगले आहेत. या ब्रँडचे पापड मला कुठे मिळतील हे कोणाला माहिती आहे का? जर कोणाला माहिती असेल तर कृपया मला कळवा कारण माझ्याकडे पापड संपत आहेत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Frederikke (@bhukkad_bidesi)

तरुणीने पुढे सांगितले की, तिने हे पापड नेपाळमधून विकत घेतले होते, पण ते कोपनहेगनमध्ये कुठेही उपलब्ध नाहीत. ती म्हणाली, माझ्या जवळील पापडचा साठा संपत चालला आहे, जर कोणाला हे पापड कुठे मिळतील किंवा हे पापड बनवणारे तुम्हाला माहिती असतील तर कृपया मला सांगा.

फ्रेडरिकची पोस्ट काही क्षणातच व्हायरल झाली आणि कमेंट सेक्शन मजेदार कमेंट्सनी भरले गेले. अमिताभ बच्चन यांनी प्रमोट केलेल्या विविध ब्रँड आणि सरकारी कार्यक्रमांचा उल्लेख करून हिंदुस्थानी नेटिझन्स मजा घेऊ लागले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;