Shubhanshu Shukla Axiom-4 – आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे! काय म्हणताहेत शुभांशूचे पालक, वाचा

Shubhanshu Shukla Axiom-4 – आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे! काय म्हणताहेत शुभांशूचे पालक, वाचा

हिंदुस्थानी हवाई दलाचा धाडसी पायलट शुभांशू शुक्ला अंतराळ मोहिमेवर जाण्यासाठी सज्ज झालेला आहे. अ‍ॅक्सिओम-4  हा प्रत्येक हिंदुस्थानींसाठी अभिमानाचा क्षण आहे. तब्बल 41 वर्षांनंतर एक हिंदुस्थानी अंतराळवीर अंतराळात जाणार आहे. 25 जूनला दुपारी 12.01 वाजता नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन C213 अंतराळयानाद्वारे ते प्रक्षेपित केले जाईल. शुभांशूच्या या कामगिरीने देश आणि त्याचे कुटुंबच खूप आनंदी आहे. यावरच शुभांशूचे आई वडिल म्हणतात, आमचा मुलगा इतिहास रचेल यात शंका नाही.

सध्याच्या घडीला शुभांशुच्या उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरात आनंदाचे वातावरण आहे. त्याचबरोबर प्रत्येक लखनऊ वासियांकडून या घटनेबद्दल अभिमानाची भावना आहे. शुंभाशूचे वडील शंभू दयाल म्हणाले की, आमच्या मुलाची कामगिरी केवळ लखनऊसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. वडिलांनी सांगितले की, त्याचे मिशन दुपारी 12  वाजता सुरु होणार आहे. आमचे शुभार्शिवाद त्याच्यासोबत आहेत. त्याचे ध्येय चांगल्या प्रकारे पूर्ण व्हावे अशी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो. शुभांशूसाठी लावलेले सर्व पोस्टर्स पाहून खूप आनंद होतो. तो केवळ लखनऊच नाही तर राज्य आणि देशाला गौरव मिळवून देत आहे. आम्हाला त्याचा अभिमान आहे.

शुभांशूची आई आशा शुक्ला देखील मुलाच्या कामगिरीवर खूप आनंदी आहेत. शुभांशूच्या मोहिमेपूर्वी त्यांनी सुनेने दिलेल्या पाठिंब्याविषयी कौतुक केले आहे. त्यांनी सांगितले की, सुनेचा पाठिंबा नसता तर मुलाला ही कामगिरी करणे सहजशक्य झाले नसते. अधिक बोलताना त्या म्हणाल्या, हा क्षण आमच्यासाठी आणि सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. सर्वत्र मुलाचे पोस्टर्स लावले जात आहेत. या देशाचा, या त्रिवेणी नगरचा मुलगा इतक्या उंचीवर पोहोचणार आहे याचा सर्वांना आनंद आहे. आम्ही त्याला आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद पाठवत आहोत. शुभांशूच्या या कामगिरीत त्याच्या बायकोची सर्वात मोठी भूमिका आहे.

Axiom-4 मिशन बुधवारी पहाटे 2:31 EDT हिंदुस्थानी वेळेनुसार दुपारी 12 वाजता अमेरिकेतील फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथील लाँच कॉम्प्लेक्स 39A वरून प्रक्षेपित होणार आहे. हिंदुस्थानचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासह क्रू कंपनीच्या फाल्कन 9 रॉकेटवर प्रक्षेपित झाल्यानंतर नवीन SpaceX ड्रॅगन अंतराळयानावर कक्षेत असलेल्या प्रयोगशाळेत प्रवास करतील. डॉकिंगची वेळ गुरुवारी सकाळी 7 वाजता असेल. तर ही वेळ हिंदुस्थानची दुपारी 4 वाजता असणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कधी कधी विनाकारण नखे का तुटतात? तज्ञांनी सांगितले मोठी कारणे कधी कधी विनाकारण नखे का तुटतात? तज्ञांनी सांगितले मोठी कारणे
अनेकदा आपली नखे अचानक कोणत्याही ठोस कारणाशिवाय तुटण्याचा अनुभव आपण घेतला असेल. तुम्ही कोणतेही जड काम केलेले नाही, किंवा तुम्हाला...
किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षणे कोणती? डॉक्टरांकडून जाणून घ्या
CBSE Board Exam – सीबीएससी आता दोनदा घेणार दहावीची बोर्डाची परीक्षा, विद्यार्थ्यांना मिळणार सुधारणेची संधी
‘गुतंवणूकदार’ मालामाल! सेन्सेक्समध्ये 700 अंकांची उसळी; 4 लाख कोटींचा झाला फायदा
मुंबई महापालिका शिवसेना जिंकणारच, चंद्रकांत खैरे यांचे प्रतिपादन; यापुढील आंदोलन महायुतीच्या भ्रष्टाचाराविरोधात
स्वातंत्र्यासाठी योगदान न देणारे आता संविधानावर बोलत आहेत, मल्लिकार्जुन खर्गे यांची भाजपवर टीका
Ashadhi Wari 2025 – खासदारताई गायब! वारीच्या नियोजन बैठकांना प्रणिती शिंदेंची दांडी; मतदारांतून नाराजीचा सूर