तळीरामांच्या खिशाला भोक, दारू महागली; देशी 80 तर महाराष्ट्र मेड क्वार्टर 148 रुपये

तळीरामांच्या खिशाला भोक, दारू महागली; देशी 80 तर महाराष्ट्र मेड क्वार्टर 148 रुपये

तिजोरीत खडखडाट असल्याने महायुती सरकार आता उत्पन्नाचे नवनवीन पर्याय शोधत आहे. तातडीने महसूल वाढवता यावा म्हणून आज सरकारने तळीरामांच्या खिशाला भोक पाडले. विक्रीवरील कर वाढवून दारू महाग करून टाकली. सरकारच्या या निर्णयामुळे यापुढे देशी दारूच्या क्वार्टरसाठी 80 रुपये तर महाराष्ट्र मेड क्वार्टरसाठी 148 रुपये मोजावे लागणार आहेत. विदेशीप्रेमींची क्वार्टर या वाढीनंतर 360 रुपये झाली आहे. मद्याचे दर वाढवल्यामुळे दरवर्षी सरकारी तिजोरीत 14 हजार कोटींची भर पडणार आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने महसूल वाढीसाठी सुचवलेल्या उपाययोजनांना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. महसूल वाढविण्यासाठी स्थापन केलेल्या सचिवस्तरीय अभ्यासगटाने उपाययोजना सुचवल्या होत्या. त्यानुसार देशी बनावटीचे एक लिटर विदेशी मद्य बनवण्यासाठी होणाऱया खर्चावर उत्पादन शुल्क 3 पटीवरून साडेचार पट करण्यात आले. देशी मद्यावरील उत्पादन शुल्क लिटरमागे 180 वरून 205 रुपये केले.

महाराष्ट्र मेड लिकर… नव्या ब्रॅण्डला मान्यता

महाराष्ट्रात आता महाराष्ट्र मेड लिकरही (एमएमएल) उपलब्ध होणार आहे. सरकारने देशी आणि विदेशी मद्याव्यतिरिक्त महाराष्ट्र मेड लिकर (एमएमएल) या धान्यापासून बनवण्यात येणाऱया विदेशी मद्याचा नवीन प्रकार तयार करण्यासही मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातील मद्य उत्पादकच या मद्याची निर्मिती करू शकणार आहेत. त्यासाठी त्यांना या नव्या ब्रॅण्डची नोंदणी करून घ्यावी लागणार आहे. एमएमएलची किंमत 148 रुपये क्वार्टर म्हणजेच 180 मी.ली. असणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;