श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे पार पडला पहिला दक्षिणद्वार सोहळा
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात आज दुपारी एकच्या सुमारास पहिला दक्षिणद्वार सोहळा पार पडला. ज्येष्ठ अमावास्येला झालेल्या या सोहळ्याची परिसरातील शेकडो भक्तगण कालपासून वाट पहात होते. याप्रसंगी ‘दिगंबरा-दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’, अशा जयघोषात भक्तांनी मंदिराची प्रदक्षिणा केली.
दक्षिणद्वार सोहळा म्हणजे काय ?
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून दत्त मंदिरासमोर वाहणारी कृष्णा नदी उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे वहाते. जेव्हा कृष्णा नदीचे पाणी वाढते तेव्हा हे पाणी मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून मुख्य गाभार्यात प्रवेश करून श्रींच्या पादुकांना स्पर्श करून मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडते. यालाच दक्षिणद्वार सोहळा असे म्हणतात. श्रींच्या चरणांवरून येणार्या कृष्णा प्रवाहात स्नान केल्याने पापांचा र्हास होऊन पुण्याची प्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने भाविकांनी या सोहळ्यासाठी गर्दी केली होती
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List