विंग कमांडर अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानच्या मेजर मुईझ ठार

विंग कमांडर अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानच्या मेजर मुईझ ठार

पाकिस्तानी सैन्याच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मेजर मुईझ असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे. मेजर मुईझ याची दक्षिण वझिरीस्तानमध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. मेजर मुईझ यांची हत्या ही पाकिस्तानी सैन्यासाठी मोठा धक्का आहे.

पाकिस्तानी सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, मेजर मुईझ हे सहाव्या कमांडो बटालियनमध्ये तैनात होते. यावेळी सरगोगाजवळ दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी मुईझवर हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान मुईझचा मृत्यू झाला. मेजर मुईझ व्यतिरिक्त दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैन्याचे लान्स नायक जिब्रानउल्लाह यांनाही ठार मारले आहे. यापूर्वीही या भागात झालेल्या ऑपरेशनमध्ये 11 दहशतवादी मारले गेले होते.

2019 मध्ये हिंदुस्थानच्या-पाकिस्तानविरुद्धच्या लढाईदरम्यान मुईझ प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्यावेळी मुईझने हिंदुस्थानचे विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा केला होता. मेजर मुईझ मूळचा पाकिस्तानातील चकवालचा रहिवासी होता. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मुईझच्या हत्येवर शोक व्यक्त केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;