CBSE Board Exam – सीबीएससी आता दोनदा घेणार दहावीची बोर्डाची परीक्षा, विद्यार्थ्यांना मिळणार सुधारणेची संधी

CBSE Board Exam – सीबीएससी आता दोनदा घेणार दहावीची बोर्डाची परीक्षा, विद्यार्थ्यांना मिळणार सुधारणेची संधी

सीबीएससी बोर्डाने दहावीच्या विद्यार्थ्यांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने 2026 पासून बोर्डाच्या परिक्षेमध्ये बदल केला आहे. त्यामुळे आता एक वर्षात या विद्यार्थ्यांना दोनदा बोर्डाच्या परिक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांवरील दबाव कमी करण्यासाठी तसेच सुधारणांसाठी संधी मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

CBSE बोर्डाचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सीबीएसीच्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा दोनदा होणार आहेत. पहिली परिक्षा ही फेब्रुवारी महिन्यात होणार तर दुसरी मे महिन्यात घेतली जाणार आहे. यात पहिली परीक्षा सर्वांना बंधनकारक असेल तर दुसरी परीक्षा ही बंधनकारक नसून ज्याला पुन्हा परीक्षा द्यायची आहे, तो या परीक्षेला बसू शकतो. जर एखादा व्यक्ती पहिल्या परिक्षेत मिळालेल्या गुणांवर समाधानी नसेल तर तो दुसरी परीक्षा देऊ शकतो.

विद्यार्थी आपल्या चुकांतून शिकत असतात त्यामुळे पहिल्या परीक्षेत चुका झाल्या तर दुसऱ्या परीक्षेत सुधारणा करू शकतात. विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी व त्यांच्यात सुधारणा होऊन त्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी हा निर्णय घेतला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;