वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवण्यासाठी पुन्हा मुदतवाढ
महाराष्ट्र राज्यातील वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (एचएसआरपी) बसवण्यासाठी आता 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य परिवहन विभागाकडून 20 जून रोज जाहीर केलेल्या माहितीनुसार, राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी असलेल्या 2.1 कोटी वाहनांपैकी केवळ 23 लाख वाहनांवर एचएसआरपी बसवण्यात आली आहे. उर्वरित वाहनांना एचएसआरपी बसवण्यासाठी तिसऱयांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. पहिली मुदतवाढ 31 मार्च, दुसरी मुदतवाढ 30 जून 2025 पर्यंत देण्यात आली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List