NASA Axiom Mission Launch Shubhanshu Shukla: गाजर हलवा, आमरस, मूग डाळ हलवा आता पोहोचले अंतराळात!

NASA Axiom Mission Launch Shubhanshu Shukla: गाजर हलवा, आमरस, मूग डाळ हलवा आता पोहोचले अंतराळात!

हिंदुस्थानी हवाई दलाचे पायलट आणि अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला अंतराळात उड्डाण करणारे दुसरे हिंदुस्थानी आहेत. बुधवार (11 जून) स्पेसएक्स रॉकेट आणि अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेसाठी क्रू ड्रॅगनने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) प्रस्थान केले आहे. फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटर येथून शुभांशू शुक्ला यांच्यासह तीन अंतराळवीरांनी उड्डाण केले आहे.

मोहिमेबद्दल शुभांशू शुक्ला यांच्या कुटुंबातील एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्ला या मोहिमेसाठी अंतराळामध्ये आमरस, मूग डाळ हलवा, गाजर हलवा घेऊन गेले आहेत. एनडीटीव्ही प्रॉफिटने दिलेल्या वृत्तानुसार ही माहिती समजते. त्यांची बहिण शुची शुक्ला म्हणाली, “हिंदुस्थानी पदार्थ हे खूप मसालेदार असल्याने, ते घेऊन जाण्याची परवानगी मिळत नव्हती परंतु अखेर त्यांनी काही पदार्थांना नेण्याची परवानगी मिळाली.”

Breaking – Mission Axiom 4 ‘कमाल की राईड’ म्हणत शुंभाशू शुक्लाचा अंतराळ यानाचा प्रवास सुरू

शुभांशू शुक्लाला प्रेमाने शक्स असेही म्हणतात. तो स्पेसएक्सच्या ड्रॅगन अंतराळयानातून आयएसएसकडे जाईल. ते अमेरिकेतील डॉ. पेगी व्हिटसन, पोलंडमधील स्लावोज उझनान्स्की-विस्निव्स्की आणि हंगेरीतील टिबोर कापू या तीन अंतराळवीरांसह उड्डाण केले आहे.

शुभांशूची आई आशा शुक्ला देखील मुलाच्या कामगिरीवर खूप आनंदी आहेत. शुभांशूच्या मोहिमेपूर्वी त्यांनी सुनेने दिलेल्या पाठिंब्याविषयी कौतुक केले आहे. त्यांनी सांगितले की, सुनेचा पाठिंबा नसता तर मुलाला ही कामगिरी करणे सहजशक्य झाले नसते. अधिक बोलताना त्या म्हणाल्या, हा क्षण आमच्यासाठी आणि सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. सर्वत्र मुलाचे पोस्टर्स लावले जात आहेत. या देशाचा, या त्रिवेणी नगरचा मुलगा इतक्या उंचीवर पोहोचणार आहे याचा सर्वांना आनंद आहे. आम्ही त्याला आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद पाठवत आहोत. शुभांशूच्या या कामगिरीत त्याच्या बायकोची सर्वात मोठी भूमिका आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;