Ashadhi Wari 2025 – खासदारताई गायब! वारीच्या नियोजन बैठकांना प्रणिती शिंदेंची दांडी; मतदारांतून नाराजीचा सूर

Ashadhi Wari 2025 – खासदारताई गायब! वारीच्या नियोजन बैठकांना प्रणिती शिंदेंची दांडी; मतदारांतून नाराजीचा सूर

आषाढी वारीच्या नियोजनासाठी सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर काम करीत आहे. या नियोजनात पंढरपूरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार प्रणिती शिंदे यांची उपस्थिती दिसत नसल्याने मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे.

येत्या 6 जुलै रोजी पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र शासन आणि पालखी मार्गावरील सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी वारकरी भाविकांना मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मात्र आपल्या मतदारसंघातील पंढरपूर तालुक्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे.

श्रीक्षेत्र जेजुरीत माउलींच्या पालखीवर भंडाऱ्याची उधळण

वारीच्या निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी कुमार विश्वास आदी मंडळी भाविकांना मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंढरपूरमध्ये सातत्याने बैठका घेत आहेत. या बैठकांमध्ये खासदार म्हणून आपला लोकप्रतिनिधी हजेरी लावत नसल्याने अडचणी सोडविण्यासाठी दाद कोणाकडे मागायची? असा प्रश्न महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. पंढरीत येणाऱ्या भाविकांबरोबर स्थानिक नागरिकांच्या काही अडीअडचणी असतात त्या जाणून सोडविण्याची आवश्यकता असते. मात्र, खासदारताई गायब असल्याने पंढरपूरकर जनता हवालदिल झाली आहे.

चंद्रभागेतील मंदिरे पाण्यात, आषाढीच्या तोंडावर पंढरीत पुराचे सावट

लोकसभा निवडणुकीत पंढरपूरकरांनी प्रणीती शिंदे यांना भरघोस मतदान केल्याने ताई खासदार झाल्या. खासदार झालेल्या ताईंनी मतदार अडचणीत असताना त्यांचे ऐकून गाऱ्हाणे सोडवावे, अशी मतदारांची अपेक्षा असते. मात्र मतदारांच्या अपेक्षांचा भंग झाला असून लोकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;