हे सरकार अदानी आणि निवडणूक आयोगाचं, आदित्य ठाकरे यांची टीका

हे सरकार अदानी आणि निवडणूक आयोगाचं, आदित्य ठाकरे यांची टीका

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शासकीय कर्मचाऱ्यांची इमारत सावलीचा बीडीडी प्रकल्पात समाविष्ट करण्यात आली होती. आता फडणवीस सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे हे सरकार अदानी आणि निवडणूक आयोगाचं आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, महाराष्ट्राची अनेक वर्ष सेवा करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या ‘सावली’ इमारतीला भाजप सरकारची ‘सावली’ नाही पण अदानी समुहाला मात्र मुंबईत 1600 एकर भूखंडासोबत अनेक ‘सवलती’!

का? हे कोणाचं सरकार आहे? हे सरकार मराठी माणसाचं नक्कीच नाही, महाराष्ट्राचंही नाही… हे सरकार अदानी आणि निवडणूक आयोगाचं आहे! उद्धवसाहेबांच्या सरकारच्या काळात सरकारने ‘सावली‘ इमारतीचा बीडीडी प्रकल्पात समावेश करून घेतला होता. त्याअंतर्गत रहिवाशांना 500 चौरस फूटांची घरं मिळणार होती पण भाजप सरकारने मात्र हा निर्णय गुपचूप उलटवला आहे.

आता प्रश्न आहे, वरळी, एन.एम. जोशी मार्ग आणि वडाळा बी.डी.डी. चाळीत राहणाऱ्या पोलिस परिवारांचा!त्यांना तरी हे सरकार घरं देणार आहे का? की इथेही जुमलाच करणार? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;