राजस्थानच्या व्यापाऱ्याची रोकड लांबवणाऱ्या आरोपीला पिंपरीतून अटक, देवनार बकरा मंडीत चोरी

राजस्थानच्या व्यापाऱ्याची रोकड लांबवणाऱ्या आरोपीला पिंपरीतून अटक, देवनार बकरा मंडीत चोरी

देवनार कत्तलखान्यात भरलेल्या बकरा मंडीत एकाने चोरी केली. राजस्थानच्या व्यापाऱयाने बकऱया विकून मिळवलेले 11 लाख 70 हजार रुपये चोराने शिताफीने लंपास केले. मंडीतून तो सुखरूप सटकला, पण देवनार पोलिसांनी अचूक माग काढत 24 तासांत त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून नऊ लाख 70 हजारांची रोकड पोलिसांनी हस्तगत करून व्यापाऱ्याला परत केली.

राजस्थानचे बकरा व्यापारी लियाकत कुरेशी यांनी देवनार बकरा मंडीत बकऱया विकून 11 लाख 70 हजार रुपये कमावले होते. पैसे सुरक्षित राहावे याकरिता त्यांनी ते गोणीत भरून बकऱयांच्या चाऱयाखाली लपवून ठेवले होते. ईदच्या दिवशी कुरेशी झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने त्यांचे दोन मोबाईल आणि पैशांची गोणी चोरून नेली. जाग आल्यानंतर हा प्रकार लक्षात येताच त्यांनी देवनार पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत वरिष्ठ निरीक्षक सय्यद व निरीक्षक विजय अंबरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राहुल मोकाटे, उपनिरीक्षक अनिल महारनूर, तांदळे, तीटकारे, मोहिते, कुंभार, कुदळे आणि सोनवणे या पथकाने तपास करून आरोपीला अटक केली.

पैसे आईकडे ठेवून बायकोकडे लपला

घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपी हा कुर्ला कसाई वाडय़ात राहणारा असून अराफत कुरेशी ऊर्फ बाबऱ्या (25) हा असल्याचे समजले. कसाई वाडय़ातील घरी आईकडे पैसे ठेवून बाबऱ्या पिंपरीत बायकोकडे जाऊन लपला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;