कामाची बात! आयटीआर भरताना चुका टाळा

कामाची बात! आयटीआर भरताना चुका टाळा

करदात्यांना दरवर्षी आयकर रिटर्न (आयटीआर) भरावे लागते. आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलैऐवजी आता 15 सप्टेंबर करण्यात आली आहे, परंतु अनेक करदात्यांकडून दरवर्षी नेहमीच्या चुका होतात. आयटीआरमध्ये नाव, पत्ता, ई-मेल आयडी, फोन नंबर, पॅन कार्ड, जन्मतारीख इत्यादी वैयक्तिक माहिती योग्यरीत्या लिहावी. ही माहिती पॅन कार्डशी जुळायला हवी. जर कोणी परतफेडीचा दावा करत असेल तर बँक तपशीलदेखील बरोबर असला पाहिजे.

जर एकापेक्षा जास्त बँक खाते असतील तर सर्वांची माहिती भरणे आवश्यक आहे. उत्पन्नाचे सर्व स्रोत जाहीर करणे आवश्यक आहे, अन्यथा दंड होण्याची शक्यता आहे. आयकर विवरणपत्र भरताना एक मोठी चूक म्हणजे सूट मिळालेले उत्पन्न जाहीर न करणे हेसुद्धा आहे. नोकरी बदलली असेल तर जुन्या कंपनीतील फॉर्म 16 नव्या कंपनीकडे द्या. पॅनकार्ड इनऑक्टिव्ह असल्यास आयकर विभाग 10 हजारांपर्यंत दंड आकारू शकते. आयटीआर भरण्यासाठी पॅन आणि आधार लिंक असणे आवश्यक आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;