श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी टोकन पध्दत सुरू, भाविकांना दर्शनपासाचे करावे लागणार ऑनलाईन बुकींग

श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी टोकन पध्दत सुरू, भाविकांना दर्शनपासाचे करावे लागणार ऑनलाईन बुकींग

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना जलद दर्शन मिळावे म्हणून मंदिर समितीने टोकन दर्शनाची रंगीत तालीम घ्यायला सुरुवात केली आहे. याकरीता दररोज 3600 भाविकांना ऑनलाईन पध्दतीने बुकींग करुन त्याचे टोकन मंदिर समितीला दाखवून दर्शनाचा लाभ घेता येत आहे.

भाविकांना दर्शनाचा लाभ घेता यावा म्हणून मंदिर समितीने सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या दृष्टीने मंदिर समिती मार्फत भाविकांसाठी संकेतस्थळावर निशुल्क दर्शन पास बुकिंगची सुविधा उपलब्ध केली आहे. यापुर्वी दररोज 1200 भाविकांना ऑनलाइन दर्शन पास बुकींग करुन मिळत होता. सद्या यात वाढ करुन दररोज 3600 भाविकांना दर्शन पास दिला जात आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर च्या अधिकृत संकेतस्थळावरून दर्शन पास बुकिंगची सुविधा भाविक भक्तांसाठी उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर करून, भक्तांना त्यांच्या इच्छित दिवशी आणि वेळेस मंदिरात पदस्पश दर्र्शन घेता येते. ज्यामुळे रांगेत जास्त वेळ उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही. सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत एकूण 6 स्लॉट निश्चित करण्यात आले आहेत. प्रति स्लॉट 600 प्रमाणे दररोज 3600 पासेस उपलब्ध असणार आहेत. भाविकांना जास्तीत जास्त 10 दिवस अगोदर बुकींग करता येणार आहे. पासेस शिल्लक राहिल्यास त्याच दिवशी तात्काळ बुकींग देखील करता येईल.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अधिकृत https://www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळाला भाविकांनी भेट देऊन टोकन घ्यावे. हे टोकन बुकींग तारखेच्या दिवशी मंदिर परिसरातील श्री संत तुकाराम भवन येथे 15 मिनिटे अगोदर भेट द्यावे. भाविकांनी आपले ओळखपत्र (उदा. आधार कार्ड) दाखवावे. टोकन पासची तपासणी करून घ्यावी. श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथे दर्शनासाठी प्रवेश दिला जात आहे. ऑनलाईन टोकन दर्शन सुविधा निशुल्क आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची मंदिर समिती फी आकारणार नाही.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या संकेतस्थळावर मंदिराची माहिती, देणगी, पुजा बुकींग, भक्तनिवास बुकींग व दर्शनपास बुकींगची सोय देखील उपलब्ध आहे. या ऑनलाईन सुविधांचा भाविकांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या व मंदिर समितीच्या 02186 224466 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसेच मंदिर समिती यांनी घेतलेल्या निर्णयानुसार आषाढी यात्रेपासून भाविकांना श्रींच्या दर्शनासाठी टोकन दर्शन व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्याचे प्रायोगिक तत्वावर टोकन दर्शन सुरु करण्यात आले आहे. ऑनलाईन बुकींग दर्शन टोकन प्राप्त केलेल्या 3600 भाविकांना दररोज दर्शनाला सोडण्यात येत आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा. -राजेंद्र शेळके, मुख्यकार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मनसे पदाधिकारी वैभव दळवी कार्यकर्त्यांसह ‘मातोश्री’वर, शिवसेनेत पक्षप्रवेश मनसे पदाधिकारी वैभव दळवी कार्यकर्त्यांसह ‘मातोश्री’वर, शिवसेनेत पक्षप्रवेश
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद वाढत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी वैभव दळवी हे शुक्रवारी ‘मातोश्री’वर दाखल झाले. वैभव...
Madhya Pradesh Salary Scam – मध्य प्रदेशात 50 हजार ‘भूतां’चा सरकारी तिजोरीवर डल्ला! 230 कोटींचा घोटाळा उघड
अशी ही पळवापळवी! लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 6 हजार 765 कोटींचा निधी पळवला!
मी अर्थमंत्री प्रणब मुखर्जींकडे मदत मागतिली होती, विजय माल्ल्याचा खुलासा
4 वर्षांपूर्वी मुलाच्या लग्नाचा बार उडवला, आता स्वत: बोहल्यावर चढले; महुआ मोईत्रा यांचे पती पिनाकी मिश्रा कोण आहेत?
NEET PG परीक्षा 3 ऑगस्टला होणार; सर्वोच्च न्यायालयाने दिली परवानगी
‘स्पिरिट’ नंतर दीपिका पदुकोणला ‘कल्की 2’ मधूनही काढले, अवास्तव मागण्यांमुळे निर्माते बेजार