इचलकरंजीत होस्टेलच्या बाथरूममध्ये विद्यार्थ्याने संपवले जीवन

इचलकरंजीत होस्टेलच्या बाथरूममध्ये विद्यार्थ्याने संपवले जीवन

इचलकरंजी शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळील ‘श्रद्धा ऍकॅडमी’तील बारावीच्या विद्यार्थ्याने होस्टेलच्या बाथरूममध्ये आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. यश अमित यादव असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना दुपारी उघडकीस आली.

दरम्यान, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून, घातपात असल्याचा संशय व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास विरोध केला. ‘मृतदेहाबाबत गावभाग पोलीस अकारण गडबड करत आहेत, त्यामुळे आम्हाला संशय वाटत आहे. आत्महत्याप्रकरणी ऍकॅडमीचालकांवर गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,’ अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. मात्र, त्याच्या वडिलांनी एका पत्राद्वारे शवविच्छेदन कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये करण्याची मागणी केली. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली. याचा अधिक तपास गावभाग पोलीस करत आहेत. या घटनेने खासगी क्लासमधील विद्यार्थी आणि शिक्षकवर्ग हादरून गेले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;