न्हावा गावात हुंदके आणि आक्रोश; उरणच्या मैथिलीला अखेरचा निरोप

न्हावा गावात हुंदके आणि आक्रोश; उरणच्या मैथिलीला अखेरचा निरोप

अहमदाबादमधील भीषण विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेली एअर हॉस्टेस मैथिली पाटील हिच्यावर आज न्हावा गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या निधनामुळे पाटील कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. सर्वांच्या लाडक्या मैथिलीला उरणवासीयांनी अखेरचा निरोप दिला तेव्हा न्हावा गावात ऐकू येत होते ते फक्त हुंदके आणि आक्रोश.

मैथिली पाटील ही ‘एअर इंडिया’मध्ये एअर हॉस्टेस म्हणून काम करीत होती. त्या काळ्याकुट्ट दुर्घटनेच्या एक दिवस आधीच तिने कुटुंबासोबत वेळ घालवला. आईबाबा व बहीण-भावासोबत गप्पाही मारल्या. दुसऱ्या दिवशी 12 जून रोजी अहमदाबाद-लंडन या फ्लाईटसाठी कामावर रवाना झाली. विमानात चढण्यापूर्वी मैथिलीने कुटुंबातील सदस्यांशी संवाददेखील साधला. मात्र काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले आणि या अपघातात मैथिलीचा मृत्यू झाला. ही बातमी तिच्या कुटुंबाला समजली तेव्हा त्यावर कोणाचाच विश्वास बसला नाही. आज तिचे पार्थिव घरी येताच आई व वडिलांनी अक्षरशः हंबरडा फोडला. तिच्या आठवणीने संपूर्ण न्हावा गाव शोकाकुल झाले. तिला अखेरचा निरोप देण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;