बिनशर्त आत्मसमर्पण करा! डोनाल्ड ट्रम्प यांची अयातुल्ला खोमेनी यांना धमकी, इराणच्या आकाशावर पूर्ण नियंत्रण असल्याचा दावा

बिनशर्त आत्मसमर्पण करा! डोनाल्ड ट्रम्प यांची अयातुल्ला खोमेनी यांना धमकी, इराणच्या आकाशावर पूर्ण नियंत्रण असल्याचा दावा

इस्रायल आणि इराणमध्ये गेल्या शुक्रवारपासून घमासान युद्ध सुरू आहे. दोन्ही देश एकमेकांवर बॅलेस्टिक मिसाईल्सचा मारा करत आहेत. त्यामुळे जगावर तिसऱ्या महायुद्धाचे ढग घोंघावू लागले आहेत. दोन्ही देश माघार घेण्यास तयार नसल्याने जगासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. आता दोन्ही देशांमध्ये युद्धविराम व्हावा यासाठी या संघर्षात अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी बिनशर्त आत्मसमर्पण करावे अशी धमकीच दिली आहे.

इस्रायलच्या हल्ल्यांना इराणने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इराणने शेकडो मिसाईल डागत इस्रायलचे ‘न भूतो’ नुकसान केले आहे. इस्रायलच्या अनेक शहरांमवर इराणने हवाई हल्ले केले आहेत. यात इस्रायलचे 24 नागरीक ठार झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यांमुळे इस्रायलही पेटून उठला असून इरानची राजधानी तेहरान बेचिराख करत सुटला आहे. तेहरानवर मिसाईलचा पाऊस पडत असून अनेक इमारती ध्वस्त झाल्या आहेत. तसेच शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हा संघर्ष महायुद्धाकडे वाटचाल करत असल्याचे पाहताच डोनाल्ड ट्रम्प कॅनडात सुरू असलेल्या जी-7 शिखर परिषद सोडून तातडीने अमेरिकेमध्ये परतले. त्यानंतर त्यांनी एक पोस्ट करत इराणला उघड धमकी दिली.

लढाई सुरू झाली आहे! ट्रम्प यांच्या विधानांनंतर खामेनींचे प्रत्युत्तर

इराणच्या आकाशावर आमचे पूर्ण नियंत्रण आहे, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. एवढेच नाही तर इराणचे सर्वोच्च नेते कुठे लपले आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. त्यांच्यापर्यंत पोहचणे सोपे आहे, पण आम्ही त्यांना मारणार नाही. त्यांनी बिनशर्त आत्मसमर्पण करावे, अशी धमकीच ट्रम्प यांनी अयातुल्ला खोमेनी यांचे नाव न घेता दिली. तर दुसरीकडे इस्रायलनेही आरपारची भूमिका घेत अयातुल्ला खोमेन यांची सद्दाम हुसेनसारखी अवस्था करू, अशी धमकी दिली. त्यामुळे हा संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.

अमेरिकेत आपत्कालीन बैठक

दरम्यान, जी-7 बैठक सोडून डोनाल्ड ट्रम्प तातडीने अमेरिकेमध्ये परतले. त्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये एक आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे. तसेच अमेरिकेने इस्लायमधील अमेरिकन दुतावास तीन दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली असून सर्व कर्मचार्‍यांना घरातच राहण्याचे निर्देश दिले आहेत. यादरम्यान ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधआन बेंझामीन नेतन्याहू यांच्याशी फोनवरून संवादही साधला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

संगमेश्वरामध्ये घरात घुसला 8 फुटांचा अजगर, सर्पमित्रांकडून जीवदान संगमेश्वरामध्ये घरात घुसला 8 फुटांचा अजगर, सर्पमित्रांकडून जीवदान
पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की कोकणातल्या घरात साप घुसतात. असाच एका घरात साप नव्हे तर चक्क अजगर घुसला होता, तोही...
शिर्डीत पादचाऱ्याचे अपहरण करून खून; शिर्डीतील अल्पवयीन मुलांचे कृत्य
‘काशीकाकांनी आईसमोरच वडिलांना मारून टाकलं’, मुलाच्या जबानीनंतर महिलेला अटक; मुलगा झाला पोरका
G7 परिषदेत पंतप्रधान मोदी-मेलोनी भेट, इटलीच्या PM ने शेअर केला फोटो
मणिपुरात माणुसकीचं दर्शन; एअर इंडिया विमान अपघातात मृत्यू पावलेल्या दोन लेकींसाठी संघर्ष ठेवला बाजूला
सरेंडर करणार नाही! हल्ला केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील; इराणचा अमेरिकेला गंभीर इशारा
Milk Rice Benefits- दररोज रात्री दूध भात खाल्ल्याने आरोग्यासाठी ‘5’ जबरदस्त फायदे होतील, वाचा