कॅप्टन सुमित सभरवाल यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप; देवा, अशी वेळ कुणावरही येऊ नये! वृद्ध पित्याला दुःख अनावर

कॅप्टन सुमित सभरवाल यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप; देवा, अशी वेळ कुणावरही येऊ नये! वृद्ध पित्याला दुःख अनावर

अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत मृत्यू झालेले पवई येथील सुमित सभरवाल यांना आज साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. कॅप्टन सुमित यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पवईमध्ये मोठय़ा संख्येने मुंबईकर आले होते. यावेळी कॅप्टन सुमित यांच्या 88 वर्षीय वडिलांना दुःख अनावर झाले. वडिलांचा आधार बनण्याची वेळ असताना बापालाच आपल्या मुलाचे अंतिम दर्शन घ्यावे लागले. त्यामुळे ‘देवा, अशी वेळ कुणावरही येऊ नये,’ अशीच भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

गेल्या चार दिवसांपासून या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना डीएनए सॅम्पलची चाचणी केल्यानंतर त्यांचे मृतदेह सोपविण्यात येत आहेत. सुमित सभरवाल यांचे पार्थिव आज त्यांच्या मुंबईतील घरी आल्यानंतर सोसायटीतील रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती.

उपस्थितांचेही डोळे पाणावले!

पार्थिवाजवळ पोहोचल्यानंतर लेकाचा रुबाबदार गणवेशातील फोटो पाहून कॅप्टन सुमित यांचे वडील गहिवरले. रडतरडतच त्यांनी लेकाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी उपस्थितांचेही डोळे पाणावले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;