Vaishnavi Hagawane Case – नीलेश चव्हाणकडूनच गुन्ह्यासाठी चिथावणी

Vaishnavi Hagawane Case – नीलेश चव्हाणकडूनच गुन्ह्यासाठी चिथावणी

वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी अटक आरोपी नीलेश चव्हाण याचा मोबाईल, शस्त्र, पासपोर्ट, लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. तसेच चव्हाण याच्याकडून सासू लता, नणंद करिश्मा, पती शशांक यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. तसेच चव्हाण याने इतर आरोपींना गुन्हा करण्यासाठी चिथावणी दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी अटक केलेल्या नीलेश चव्हाण आणि सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.

वैष्णवीचे बाळ ताब्यात असताना चव्हाण याने बाळाशी गैरवर्तन केले आहे का?, चव्हाण याचा गुह्याच्या कटात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्याबाबत तपास करायचा आहे. चव्हाण आणि इतर आरोपींमधील मोबाईल फोनच्या माध्यमातून नेमके काय संभाषण झाले त्याबाबत तपास करायचा आहे. त्यामुळे त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करावी, अशी मागणी सरकारी वकील नितीन अडागळे यांनी केली, तर राजेंद्र आणि सुशील हगवणे यांच्या पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत चव्हाण याच्या पोलीस कोठडीत 7 जूनपर्यंत वाढ करण्याचा आदेश दिला, तर राजेंद्र आणि सुशील याची न्यायालयीन कोठडी सुनावली.
हगवणे मायलेकाला

तीन दिवसांची पोलीस कोठडी

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी हगवणे मायलेकावर जेसीबी मशीनच्या व्यवहारात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी न्यायालयीन कोठडीतून मंगळवारी शशांक हगवणे आणि लता हगवणे या मायलेकाला ताब्यात घेतले. राजगुरूनगर न्यायालयात त्यांना हजर केले असता दोघांनाही 6 जूनपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;