बॉम्बच्या धमकीनंतर इंडिगोचे विमान नागपुरात उतरवले

बॉम्बच्या धमकीनंतर इंडिगोचे विमान नागपुरात उतरवले

कोचीहून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या ‘6ई2706’ विमानात बॉम्ब असल्याची धमकी आल्यानंतर त्या विमानाचे मंगळवारी सकाळी 11.30 च्या सुमारास नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ईर्मजन्सी लँडिंग करण्यात आले. त्यानंतर लगेच पोलिसांनी विमानाचा ताबा घेऊन अधिक तपास सुरू केला. श्वानपथकाने घातक वस्तूचा शोध घेतला. मात्र कोणतीही घातक वस्तू आढळली नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मस्कतहून दिल्लीला चाललेल्या या विमानात एकूण 157 प्रवासी होते.

डीजीसीएने वैमानिकांचा प्रशिक्षण रेकॉर्ड मागवला

‘रॉयटर्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, डीजीसीएने अहमदाबाद भीषण अपघातात सहभागी वैमानिक आणि फ्लाइट डिस्पॅचरचे प्रशिक्षण रेकॉर्ड एअर इंडियाकडे मागितले आहे. लंडनला जाणाऱ्या बोईंग 787-8 ड्रीमलायनरच्या अपघातामुळे प्रशिक्षण प्रोटोकॉल आणि सुरक्षा पद्धतींचा व्यापक आढावा घेतला जात आहे. डीजीसीएने सर्व फ्लाइंग स्कूलना सुरक्षा अनुपालन तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;