जुईश ट्रस्टच्या जागेतील अतिक्रमण हटवा,हायकोर्टाचे पनवेल महापालिकेला आदेश

जुईश ट्रस्टच्या जागेतील अतिक्रमण हटवा,हायकोर्टाचे पनवेल महापालिकेला आदेश

पनवेल येथील जुईश ट्रस्टच्या जागेत झालेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत.

मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. ट्रस्टच्या भूखंडावर अतिक्रमण करणाऱयांना नोटीस द्या. त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. संबंधित बांधकाम अवैध असल्यास त्यावर कारवाई करा, असे आदेश न्यायालयाने पनवेल पालिकेच्या डी वॉर्ड ऑफिसला दिले आहेत. ही संपूर्ण कार्यवाही तीन महिन्यांत पूर्ण करा, असेही खंडपीठाने आदेशात नमूद केले आहे.

मृतदेह धुण्यासाठी जागा आरक्षित

येथील भूखंड अंत्यसंस्कार करण्याआधी मृतदेह धुण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. या जागेवर झोपडय़ांसह अन्य अवैध बांधकाम झाले आहे. याची तक्रार पालिकेकडे करण्यात आली. पालिकेने या बांधकामांना नोटीस धाडली. पण कारवाई केली नाही. येथील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला द्यावेत, अशी मागणी ट्रस्टने याचिकेत केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;