500 कोटी गुंतवून कमावले 9 हजार कोटी, मुकेश अंबानी यांचा मास्टरस्ट्रोक

500 कोटी गुंतवून कमावले 9 हजार कोटी, मुकेश अंबानी यांचा मास्टरस्ट्रोक

उद्योगपती मुकेश अंबानी यांनी 2008 मध्ये एशियन पेंट्समध्ये 500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. परंतु, यातून त्यांना 2200 टक्के रिटर्न्स मिळाले आहेत. अंबानी यांना एशियन पेंट्सच्या शेअर्समधून 9080 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. रिलायन्सने नुकतेच एशियन पेंट्समधील जवळपास 87 लाख शेअर्सची विक्री केली आहे. 2008 मध्ये जागतिक आर्थिक मंदी आली होती. त्यामुळे शेअर्सचे भाव खाली आले होते. रिलायन्स इंडस्ट्रीजने 500 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. आता एशियन पेंट्सच्या शेअर्सची किंमत वाढली आहे. त्यामुळे त्यांनी 2207.65 रुपये प्रति शेअर्सच्या किंमतीने आयसीआयसीआय प्रूडेंशियल लाइफ म्युच्युअल फंडला विकले आहेत. या कंपनीला 1876 कोटी रुपये मिळाले आहेत. याआधी रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या आठवडय़ात 3.5 कोटी शेअर 2201 रुपये प्रति शेअर या भावाने एसबीआय म्युच्युअल फंडला 7704 कोटी रुपयांत विकले होते.

टायमिंग साधला

2008 मध्ये जागतिक आर्थिक मंदी आल्यानंतर भल्याभल्या कंपन्यांवर आर्थिक संकट ओढवले होते. लेहमन ब्रदर्ससारख्या दिग्गज कंपन्या तोटय़ात आल्या होत्या. त्यावेळी मुकेश अंबानी यांनी पुढचा लाँग टर्म विचार करून 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करून एशियन पेंट्सचे शेअर्स खरेदी केले होते. 17 वर्षानंतर मुकेश अंबानी यांना पाचशे कोटींचे तब्बल नऊ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. मुकेश अंबानी यांनी बरोबर टायमिंग साधून शेअर्सची खरेदी-विक्री केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;