लढाई सुरू झाली आहे! ट्रम्प यांच्या विधानांनंतर खोमेनींचे प्रत्युत्तर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडून ‘बिनशर्त आत्मसमर्पण’ ची मागणी केल्यानंतर, इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खोमेनी यांनी प्रथमच सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इस्रायलला इशारा देत लिहिले आहे की, ‘लढाई सुरू झाली आहे’.
‘अली खैबरला परततो’, असे त्यांनी फारसी भाषेत लिहिले असून त्याचे इंग्रजी भाषांतर Iran International या माध्यमाने दिले. हे विधान शिया इस्लाममधील पहिल्या इमामाच्या संदर्भात आहे, ज्यांनी सातव्या शतकात खैबर या यहुदी वस्तीवर विजय मिळवला होता, अशी माहिती The Times of Israelने दिली आहे.
या पोस्टमध्ये एका तलवारधारी व्यक्तीचा किल्ल्याच्या दरवाज्यातून प्रवेश करतानाचा फोटो आहे, आणि आकाशात ज्वाळांचा भडका असे दाखवलेले आहे.
काही मिनिटांतच खोमेनींनी दुसरी पोस्ट करत इस्रायलला पुन्हा इशारा दिला: ‘दहशतवादी झायोनिस्ट (Zionist regime) शासनाला आपण जोरदार प्रत्युत्तर द्यायला हवे. आपण झायोनिस्टांवर कोणतीही दया दाखवणार नाही’.
इस्रायल-इराण संघर्षाचा सहावा दिवस
इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष बुधवारी सहाव्या दिवशीही सुरूच राहिला. दोन्ही देशांनी एकमेकांवर नव्याने क्षेपणास्त्रांचा मारा केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणकडून बिनशर्त शरणागतीची मागणी केल्यानंतरही ही कारवाई सुरूच आहे.
इस्रायली लष्कराने सांगितले की, बुधवारी पहाटे पहिल्या दोन तासांत इराणने दोन टप्प्यात क्षेपणास्त्रांचा मारा केला.
या दरम्यान तेल अवीव शहरात स्फोटांच्या आवाजाने खळबळ उडाली.
Khamenei Declares “The Battle Begins” Amid Escalating Israel-Iran Conflict | Sixth Day of Missile Strikes
Keywords: Khamenei battle begins, Trump Iran threat, Israel Iran missile strikes, Iran conflict 2025, Ayatollah Khamenei warning, Trump unconditional surrender, Iran Israel war
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List