Air India Flight : एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड, दिल्ली ते पॅरिस फ्लाइट रद्द

Air India Flight : एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड, दिल्ली ते पॅरिस फ्लाइट रद्द

एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने दिल्ली-पॅरिस फ्लाइट AI143 रद्द करण्यात आली. उड्डाणापूर्वीच्या अनिवार्य तपासणीत काही तांत्रिक अडचणी आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला. यामुळे 18 जून रोजी पॅरिसहून दिल्लीला येणारी उड्डाण AI142 रद्द करण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, उड्डाणापूर्वीच्या तपासणीत आढळलेली तांत्रिक अडचण सध्या दुरुस्त केली जात आहे. मात्र पॅरिसच्या चार्ल्स द गॉल (CDG) विमानतळावर रात्रीच्या उड्डाणांवर असलेल्या निर्बंधांमुळे हे उड्डाण रद्द करावे लागले. यामुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एअर इंडियाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

एअर इंडियाने प्रवाशांना हॉटेलमध्ये निवासाची सोय उपलब्ध करून दिली आहे. तसेच उड्डाण रद्द केल्यास पूर्ण परतावा किंवा विनामूल्य पुनर्नियोजनाची सुविधा देण्याचे आश्वासन दिले आहे. प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे, असंही एअर इंडियाने सांगितलं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;