Iran Attack Mossad Headquarters : इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद मुख्यालयावर मिसाइल हल्ला, इमारत उद्ध्वस्त; इराणचा मोठा दावा

Iran Attack Mossad Headquarters : इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद मुख्यालयावर मिसाइल हल्ला, इमारत उद्ध्वस्त; इराणचा मोठा दावा

इराणने एका मोठा दावा केला आहे. इराणच्या रिव्हॉल्यूशनरी गार्ड्सच्या म्हणण्यानुसार, त्यांनी इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणा मोसादच्या तेल अवीवमधील मुख्यालयावर मिसाइल हल्ला करून ते पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. हा हल्ला इस्रायलविरुद्धच्या प्रत्युत्तर कारवाईचा भाग असल्याचे इराणने म्हटले आहे.

इराण आणि इस्रायलमधील तणाव गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. इस्रायलने इराणच्या अण्वस्त्र केंद्रांसह काही लष्करी तळांवर हल्ले केल्याच्या पार्श्वभूमीवर इराणने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. इराणच्या रिव्हॉल्यूशनरी गार्ड्सने हा हल्ला अचूक आणि नियोजित असल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यामुळे तेल अवीव शहरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट दिसल्याचे आणि स्फोटांचा आवाज ऐकू आल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि फोटोमधून दिसून आले आहे.

या हल्ल्याबाबत इस्रायलकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र इराणच्या या दाव्याने दोन्ही देशांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोसाद ही इस्रायलची गुप्तचर यंत्रणा आहे, जी जगभरात आपल्या कारवायांसाठी ओळखली जाते. इराणचा हा दावा खरा निघाल्यास तो इस्रायलसाठी मोठा धक्का असेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;