डोनाल्ड ट्रम्प यांचा स्मार्टफोन T1 Phone 8002 लॉन्च, अ‍ॅपल-सॅमसंगला आधी टेरिफची धमकी; आता टक्कर

डोनाल्ड ट्रम्प यांचा स्मार्टफोन T1 Phone 8002 लॉन्च, अ‍ॅपल-सॅमसंगला आधी टेरिफची धमकी; आता टक्कर

अमेरिकेत उत्पादन हलवल्यास अ‍ॅपल आणि सॅमसंगला जास्त टेरिफ आकारण्याची धमकी दिल्याच्या काही आठवड्यांनंतरच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड सादर केला आहे. या स्मार्टफोन ब्रँडचे नाव ‘ट्रम्प मोबाईल’ (Trump Mobile) आहे. T1 Phone 8002 (गोल्ड व्हर्जन) हा फोन 499 डॉलर (सुमारे 42,893 रुपये) किमतीत सादर करण्यात आला आहे. हा फोन सप्टेंबर 2025 मध्ये ग्राहकांना उपलब्ध होईल, ज्यासाठी 100 डॉलरची आगाऊ रक्कम देऊन बुकिंग करता येईल.

ट्रम्प मोबाईलचे फीचर्स

ट्रम्प मोबाईलचा T1 Phone 8002 हा अँड्रॉइड 15 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यात 6.78 इंचांचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये 256 जीबी स्टोरेज, 12 जीबी रॅम आणि 5000 mAh बॅटरी आहे. याशिवाय 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. ट्रम्प यांनी हा फोन ‘मेड इन अमेरिका’ म्हणून प्रचारित केला आहे. त्यांनी आपल्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाला बळ देण्यासाठी हा फोन लॉन्च करण्यात आला आहे, असं बोललं जात आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात अ‍ॅपलचे सीईओ टिम कूक यांच्याशी चर्चा करताना आयफोनचे अधिक उत्पादन अमेरिकेत करण्याबाबत चर्चा केली होती. तसेच हिंदुस्थानात उत्पादन करणाऱ्या अ‍ॅपलवर 25 टक्के टेरिफ लावण्याची धमकी दिली होती. सॅमसंग आणि इतर स्मार्टफोन उत्पादकांनाही त्यांनी हीच धमकी दिली होती. जून 2025 च्या अखेरीस हे टेरिफ लागू होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांचा हा स्मार्टफोन लॉन्चचा निर्णय त्यांच्या व्यापार धोरणाचा भाग मानला जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;