पैसा फेको, तमाशा देखो असं सध्याचं राजकारण, उद्धव ठाकरे यांचा निशाणा

पैसा फेको, तमाशा देखो असं सध्याचं राजकारण, उद्धव ठाकरे यांचा निशाणा

“मला तुमचा अभिमान आहे. तुमच्यासारख्या सच्चा आणि निष्ठावंत शिवसैनिकांसाठीच मी लढतो आहे. आज कदाचित पराभव आपल्या पदरी पडला असेल पण उद्याचा दिवस आपला आहे.”

‘स्वार्थासाठी काहीजण दुसरीकडे गेले आणि माझ्याविरोधात बोलत आहेत. ‘पैसा फेको तमाशा देखो’ असं सध्याचं राजकारण झालं आहे,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गद्दारांवर निशाणा साधला.

शिवसेना नेते अनंत गिते यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मातोश्री निवासस्थानी यावेळी रायगड जिह्यातील शिवसैनिक मोठय़ा संख्येने आले होते. त्यांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. रायगड जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या जिह्यात आपण नेहमीच जिंकत आलो आहोत. तिथे आपला खासदार होता, तीन-चार आमदारही निवडून यायचे. वर-खाली होतच असतं. वरती गेलं म्हणून डोक्यात हवा जाऊ द्यायची नसते आणि खाली आलो म्हणून नैराश्याने ग्रासून जायचे नसते. आपण कशासाठी काम करत आहोत हे एकदा डोक्यात असलं की बाकीच्या गोष्टी आपोआप सुटतात, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी निष्ठावंत शिवसैनिकांची पाठ थोपटली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;