हिंदुस्थान-पाकिस्तान श्रीलंकेमध्ये भिडणार, महिला वन डे वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर; हिंदुस्थानमध्ये 30 सप्टेंबरपासून रंगणार थरार

हिंदुस्थान-पाकिस्तान श्रीलंकेमध्ये भिडणार, महिला वन डे वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर; हिंदुस्थानमध्ये 30 सप्टेंबरपासून रंगणार थरार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी महिला वन डे क्रिकेट वर्ल्ड कपचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले. यजमान हिंदुस्थान आणि पाकिस्तान हे पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी हायब्रिड मॉडेलनुसार 5 ऑक्टोबरला कोलंबोमध्ये (श्रीलंका) भिडतील. हिंदुस्थानला तब्बल 12 वर्षांनंतर महिला वन डे वर्ल्ड कपचे यजमानपद मिळाले आहे. याआधी हिंदुस्थानमध्ये 2013 साली अखेरचा महिला वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता.

पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर हिंदुस्थानकडून प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानात ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविण्यात आले होते. त्यामुळे पाकिस्तानी संघाचे हिंदुस्थानात आगमन अशक्य असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हिंदुस्थान-पाकिस्तान सामना तसेच पाकिस्तानचे इतर सामने श्रीलंकेतील कोलंबोमध्ये आयोजित करण्याचा निर्णय ‘आयसीसी’ने घेतला आहे. हायब्रीड मॉडेलनुसार पाकिस्तान संघाचे सर्व सामने श्रीलंकेतच होणार आहेत.

5 शहरांत 28 लीग अन् 3 नॉकआउट सामने

हिंदुस्थानच्या यजमानीत होणारा हा महिला वर्ल्ड कप बंगळुरू, इंदूर, गुवाहाटी, विशाखापट्टणम आणि कोलंबो या पाच ठिकाणी होणार आहे. या स्पर्धेत एकूण 28 लीग सामने आणि 3 नॉकआउट सामने खेळवले जातील. पहिला उपांत्य सामना 29 ऑक्टोबरला गुवाहाटी किंवा कोलंबो येथे (पाकिस्तानच्या पात्रतेवर अवलंबून) आणि दुसरा उपांत्य सामना 30 ऑक्टोबरला बंगळुरू येथे होईल. अंतिम सामना 2 नोव्हेंबर रोजी बंगळुरू किंवा कोलंबो येथे होणार आहे. यजमान हिंदुस्थान आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर 30 सप्टेंबरला उद्घाटनाचा सामना रंगणार आहे. त्यानंतर 26 ऑक्टोबरला हिंदुस्थान-बांगलादेश यांच्यातील सामनाही बंगळुरू येथेच होईल.

पाकिस्तानचे सर्व सामने कोलंबोतच

पाकिस्तानी संघाचे सर्व सामने कोलंबो येथे होणार असून ते बांगलादेश (2 ऑक्टोबर), इंग्लंड (15 ऑक्टोबर), न्यूझीलंड (18 ऑक्टोबर), दक्षिण आफ्रिका (21 ऑक्टोबर) आणि श्रीलंका (24 ऑक्टोबर) या संघांविरुद्ध खेळतील. गतविजेता ऑस्ट्रेलिया संघ आपली मोहीम 1 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध इंदूरच्या होळकर स्टेडियमवर सुरू करणार आहे. त्यानंतर 8 ऑक्टोबरला कोलंबो येथे पाकिस्तानविरुद्ध सामना खेळेल. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सामना 22 ऑक्टोबरला इंदूरमध्ये होणार आहे.

फॉरमॅट तोच, फक्त विंडीज बाहेर

यंदाच्या महिला क्रिकेट वर्ल्ड कपचा फॉरमॅट 2022च्या वर्ल्ड कपप्रमाणेच असेल. आठ संघ राऊंड-रॉबिन फॉरमॅटमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतील आणि अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. यजमान हिंदुस्थानसह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांनी थेट पात्रता मिळवली होती. पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी लाहोरमध्ये झालेल्या पात्रता स्पर्धेतून आपली जागा निश्चित केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मधमाशी गिळल्याने करिश्माच्या पूर्व पतीचा मृत्यू? किती प्राणघातक ठरू शकतो डंख? मधमाशी गिळल्याने करिश्माच्या पूर्व पतीचा मृत्यू? किती प्राणघातक ठरू शकतो डंख?
अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूरचं 12 जून रोजी निधन झालं. इंग्लंडमध्ये पोलो खेळताना संजय कपूरचं निधन...
जूनच्या मध्यातच उजनी निम्मे भरले
मुसळधार पावसाने शिराळा, वाळवा, पलूसला झोडपले
कोल्हापुरात पावसाचे पुन्हा धुमशान, पंचगंगेच्या पातळीत तब्बल 10 फुटांची वाढ; 13 बंधारे पाण्याखाली
फिटनेस प्रमाणपत्राशिवाय धावताहेत स्कूल बस
कुंडमळा दुर्घटनेनंतर डाराडुर प्रशासनाला जाग; शहरासह जिल्हयातील पुलांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट
99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; शिवेंद्रराजे भोसले यांची स्वागताध्यक्षपदी निवड