वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण – हगवणे कुटुंबीयांचे जेसीबी मशीन जप्त

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण – हगवणे कुटुंबीयांचे जेसीबी मशीन जप्त

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी हगवणे माय-लेकावर जेसीबी मशिनच्या व्यवहारात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचे जेसीबी मशीन जप्त केले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली. तसेच, कारागृहातून त्यांचा ताबा घेण्यासाठी या प्रकरणात प्रोडक्शन वॉरंट काढण्यात आले आहे.

प्रशांत अविनाश येळवंडे (वय 33, रा. निघोजे, ता. खेड) यांनी 29 मे रोजी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, शशांक राजेंद्र हगवणे आणि लता राजेंद्र हगवणे (दोघे रा. भुकूम, ता. मुळशी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लता हगवणे हिच्या नावावर असलेले जेसीबी मशीन प्रशांत येळवंडे यांनी खरेदी करण्याचा व्यवहार ठरला. जेसीबीच्या बँक कर्जाच्या हप्त्याची दरमहा 50 हजारांची रक्कम येळवंडे हे शशांकला देत होते. मात्र, त्याने हप्ते न भरता रिकव्हरी एजंटला हाताशी धरून जेसीबी मशिन येळवंडे यांच्याकडून काढून स्वतःच्या ताब्यात घेतले.

पोलिसांचा न्यायालयाकडे अर्ज
सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या शशांक आणि लता हगवणे यांच्या अटकेसाठी महाळुंगे पोलिसांनी प्रोडक्शन वॉरंट जारी केले आहे. आर्थिक फसवणूकप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासकामी शशांक आणि लता यांना ताब्यात देण्यात यावे, असा अर्ज महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी न्यायालयाकडे सादर केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;