टेरर फंडिंगशिवाय अशा घटना घडू शकत नाहीत, पहलगाम हल्ल्यावर FATF ने पाकिस्तानला फटकारले

टेरर फंडिंगशिवाय अशा घटना घडू शकत नाहीत, पहलगाम हल्ल्यावर FATF ने पाकिस्तानला फटकारले

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहशतवादी अर्थपुरवठ्यावर नजर ठेवणारी संस्था फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सने (FATF) कठोर शब्दांत निंदा केली आहे. या हल्ल्यामागे दहशतवाद्यांना मिळणारे आर्थिक पाठबळ हा प्रमुख मुद्दा असल्याचे एफएटीएफने स्पष्ट केले आहे. संस्थेने म्हटले आहे की, असे क्रूर हल्ले दहशतवादी नेटवर्कमधील टेरर फंडिंगशिवाय शक्य होऊ शकत नाहीत.

‘दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ बंद करा’

एफएटीएफने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, पहलगाम हल्ल्यासारख्या घटनांमागे एक सुसंघटित आणि खोलवर रुजलेले आर्थिक नेटवर्क कार्यरत आहे, जे जगभरात दहशतवादाचा प्रसार करण्यासाठी पैशांचा वापर करते. जोपर्यंत दहशतवादाला आर्थिक पुरवठा होत राहील, तोपर्यंत दहशतवादी कारवाया थांबणार नाहीत,” असे एफएटीएफने सांगितले.

या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी दहशतवादी अर्थपुरवठा रोखण्याच्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे संस्थेने म्हटले आहे. एफएटीएफच्या अध्यक्षा एलिसा दे अंदा माद्राजो म्हणाल्या आहेत की, “दहशतवाद्यांना फक्त एकदा यशस्वी होण्याची गरज असते, पण आपल्याला प्रत्येक वेळी त्यांना रोखण्यासाठी यशस्वी व्हावे लागते.” त्यांनी दहशतवादी अर्थपुरवठ्याचा सामना करण्यासाठी जागतिक समुदायाला एकत्र येण्याचे आवाहन केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;