Rain Update – पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार; मुंबई, ठाणे, पालघर, रायगडला ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी

Rain Update – पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार; मुंबई, ठाणे, पालघर, रायगडला ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी

मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे पूर, पाणी तुंबण्याच्या घटना घडत आहेत. पावसाचा जोर पुढील पाच दिवस कायम राहणार आहे. हवामान खात्याने पुढील पाच दिवस मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रायगड आणि पुणे भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

16 जून – कोकण-गोव्यात बहुतेक ठिकाणी, दक्षिण महाराष्ट्रातील अनेक भागात आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस किंवा गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

17 जून – कोकण-गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस आणि मराठवाड्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता.

18 जून – कोकण-गोव्यात बहुतांश भागांत आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही भागात मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रात हलका ते मध्यम आणि मराठवाड्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल.

19 जून – कोकण-गोव्यात मध्यम पाऊस, दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात मराठवाड्यात हलका पाऊस पडेल.

20 जून – कोकण आणि गोव्यात मध्यम, दक्षिण महाराष्ट्रात हलका ते मध्यम आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गडगडाटी पाऊस पडण्याची शक्यता.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;